महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकारण नको, मारेकऱ्यांना फासावर लटकवा

05:17 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कन्हैयालाल यांच्या पुत्राची मागणी : दहशतवाद्यांनी केली होती हत्या

Advertisement

सोशल मीडियावर एका पोस्टचे कथित समर्थन केल्याप्रकरणी कन्हैयालाल या टेलरची मागील वर्षी दहशतवाद्यांकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.  या घटनेनंतर कन्हैयालाल यांचे पुत्र यश साहूने मारेकऱ्यांना फासावर लटकविले जात नाही तोवर अनवाणी पायांनी राहण्याचा, स्वत:चे केस न कापण्याचा आणि वडिलांच्या अस्थी न विसर्जित करण्याची शपथ घेतली आहे. यश हा 21 वर्षांचा आहे. मी माझ्या शपथेवर ठाम राहणार आहे. आम्हाला या प्रकरणी राजकारण नको असून केवळ मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी इतकीच आमची मागणी असल्याचे यशचे सांगणे आहे.

Advertisement

राजस्थानच्या उदयपूरच्या हाथीपोल भागात टेलर म्हणून काम करत असलेल्या कन्हैयालाल यांची त्यांच्याच दुकानात दोन दहशतवाद्यांनी चाकूने हल्ला करत हत्या केली होती. कन्हैयालाल यांच्या हत्येचा मुद्दा राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रस्थानी आहे. 28 जून रोजी हत्या होण्यापूर्वी कन्हैयालाल यांना धमक्या मिळत होत्या. हत्येच्या घटनेनंतर आमचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. नेते आमच्याकडे येतात आणि परस्परांवर आरोप करतात. या मुद्द्यावर राजकारण व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु राजकीय पक्षांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेत मारेकऱ्यांना फासावर लटकविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे यश साहूने म्हटले आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येचा मुद्दा भाजपने प्रचारात लावून धरत काँग्रेसवर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला आहे.

हत्येचा मुद्दा केंद्रस्थानी

निश्चितपणे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या घटनेचा निवडणुकीवर प्रभाव पडणार आहे. या निर्घृण घटनेनंतर लोकांमध्ये संताप आहे. कन्हैयालाल यांची हत्या ही राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच घडली. कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना मिळत असलेल्या धमक्यांबद्दल कळविले होते, परंतु कुठलीच कारवइा& झाली नव्हती. या बेजबाबदारपणामुळे शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा दावा उदयपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ताराचंद जैन यांनी केला आहे.

भाजपचा आरोप, काँग्रेसचे प्रत्युत्तर

ताराचंद जैन यांच्यानुसार शासकीय भरती परीक्षांवेळी प्रश्नपत्रिका फुटल्याने राज्यातील तरुण-तरुणींचे मोठे नुकसान झाले आहे. उदयपूर मतदारसंघाचे आमदार राहिलेले भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे. उदयपूर मतदारसंघात काँग्रेसकडून गौरव वल्लभ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येत सामील गुन्हेगार हे भाजपचे सदस्य होते. भाजप नेत्यांसोबतची त्यांची छायाचित्रे असून यात आसामचे राज्यपालही सामील असल्याचा आरोप वल्लभ यांनी केला आहे. राजस्थान पोलिसांनी आरोपीला पकडले होते, मग एनआयएने हे प्रकरण अत्यंत घाईने हे प्रकरण स्वत:च्या हातात का घेतले? कुणाला वाचविण्यासाठी ही तत्परता दाखविण्यात आली याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकांना द्यावे. हत्येच्या घटनेनंतर राज्य सरकारने कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला चोवीस तास पोलीस सुरक्षा प्रदान केली. त्यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी देण्यात आल्याचे वल्लभ यांनी म्हटले आहे.

प्रकरण तडीस न्यावे

हत्या प्रकरणाची चौकशी अन् सुनावणी तडीस न्यावी. एनआयए आम्हाला न्यायालयातील घडामोडींविषयी सांगत नसल्याचे कन्हैयालाल यांच्या पत्नी यशोदा यांनी म्हटले आहे. रियाज अटारी आणि गौस मोहम्मद या दहशतवाद्यांवर कन्हैयालाल यांची हत्या करणे, गुन्ह्याचे चित्रिकरण करणे आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्याचा आरोप आहे. हत्येच्या घटनेच्या काही तासांनीच त्यांना राजसमंद जिल्ह्यातून पकडण्यात आले होते. अटारी आणि गौस समवेत 8 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

उदयपूरमधील मुस्लीम समुदायाची भूमिका

या हत्येच्या घटनेशी समुदायाचे कुठलेच देणेघेणे नाही. या प्रकरणाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये असे उदयपूरमधील मुस्लीम समुदायाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. ही घटना दुर्दैवी होती आणि समुदायाने याची निंदा केली होती. अशा प्रकरणांना पूर्ण समुदायाशी जोडले जाऊ नये असे धार्मिक नेते मुफ्ती शकीरुल कादरी यांनी नमूद केले आहे.

उदयपूरमधील राजकीय समीकरणे

कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उदयपूरमध्ये आम्हाला सुरक्षित वातावरण हवे  आहे. एखादे सरकार उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारप्रमाणे काम करत असेल तरच हे शक्य असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या हत्येसोबत सरोवरांची सफाई, स्वच्छता, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थ हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. उदयपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गुलाबचंद कटारिया यांनी सलग 4 वेळा येथे विजय मिळविला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article