For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालचे मॉडेल कुणीच लागू करणार नाही!

06:19 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालचे मॉडेल कुणीच लागू करणार नाही
Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य : तृणमूल खासदाराने विचारला होता प्रश्न

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना देशाचे कुठलेही राज्य पश्चिम बंगालचे मॉडेल लागू करू इच्छिणार नसल्याची टिप्पणी केली आहे. रॉय यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान डाव्या उग्रवादाशी संबंधित पूरक प्रश्न विचारला होता.

Advertisement

पश्चिम बंगालमधील डाव्या उग्रवादाच्या खात्म्याचा दाखला देत केंद्र सरकार हे मॉडेल अन्य राज्यांमध्ये लागू करणार का असा प्रश्न सौगत रॉय यांनी विचारला होता. कुठल्याही राज्याने चांगली कामगिरी केली तर त्याच्या उदाहरणाला लागू करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला कुठलीच अडचण नाही, परंतु पश्चिम बंगालचे मॉडेल लागू करण्यास कुठलेही राज्य इच्छुक नसेल असे वक्तव्य शाह यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.