For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कोणीही रोखू शकत नाही; ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्राचा दावा

06:09 PM Jan 01, 2024 IST | Kalyani Amanagi
 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कोणीही रोखू शकत नाही  ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्राचा दावा
Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणे निश्चित आहे आणि कोणीही रोखू शकत नाही, असा दावा ब्रिटिश वृत्तपत्राच्या लेखात केला आहे.ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र 'द गार्डियन'मध्ये हा लेख लिहिला आहे.लेखात असा दावा करण्यात आला आहे की, '२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.'

Advertisement

हा लेख हॅना ॲलिस पीटरसन यांनी लिहिला होता. 'तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यांना थांबवणे जवळजवळ अशक्य आहे. तीन राज्यांतील विजयानंतर खुद्द पंतप्रधान मोदीही 2024 मध्ये विजयाचे भाकीत करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. असं या लेखात लिहलं आहे.

पीटरसन पुढे लिहितात की 'पंतप्रधानांची लोकप्रियता आणि एक मजबूत नेता म्हणून त्यांची प्रतिमा, तसेच भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंडा, विशेषत: उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील हिंदू मतदार मोठ्या संख्येने प्रभावित आहेत. 2014 पासून, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर देशातील जनमत मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकले आहे. लेखात लिहिले आहे की, 'भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात भाजपपेक्षा विरोधी पक्ष ताकदवान आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर विरोधक विखुरलेले आणि कमकुवत दिसतात.'

Advertisement

पीटरसन यांनी काँग्रेसबद्दल लिहिले आहे की, 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये विजय मिळवला आहे, परंतु तीन राज्यांमध्ये ते अजूनही सत्तेत आहे आणि पक्ष अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. विरोधी पक्षांनी युती केली असली तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, हे सर्व पक्ष भाजप विरोधात एकदिलाने लढणार असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपचा विजय निश्चित दिसत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

Advertisement
Tags :

.