कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रवादी एकत्रिकरणाबाबत अधिकृत बैठक नाही

05:31 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

पाचगणी :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या चर्चांवर थेट उत्तर देत, ‘अधिकृत पातळीवर कोणतीही बैठक अथवा चर्चा झालेली नाही,’ असे स्पष्ट करून या चर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर दोन पवार गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला असला तरी, शरद पवार साहेबांनी आमच्यापर्यंत कोणताही संदेश पोहोचवलेला नाही,’ असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी सूचित केले की, काही आमदारांना सत्तेत जाण्याची आणि त्यांच्या प्रलंबित कामांना गती देण्याची भावना असू शकते, पण या चर्चांना कोणतेही अधिकृत अधिष्ठान नाही.

सुप्रिया सुळे यांच्यावर शरद पवारांनी अधिकार सोपवल्याच्या चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘सुप्रिया सुळे या राष्ट्रीय स्तरावर पक्षाच्या नेत्या आहेत. पवार साहेबांनी त्यांना काही विशेष जबाबदारी दिली असेल, तर ती त्यांच्याशी चर्चा करूनच ठरवली जाईल.’

महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर परखड टीका करताना रोहित पवार म्हणाले, ‘राज्यातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची गरज आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या अशी कोणतीही तयारी दिसत नाही.’

राजकीय विश्लेषकांच्या मते, रोहित पवार यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चांचे वादळ उठले आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार सोपवल्याच्या चर्चा सध्या जोमात असताना, रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य कुटुंबातील अंतर्गत शक्तिसंतुलनात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article