प्राप्तिकर विवरणपत्रासाठी आता मुदतवाढ नाही!
07:00 AM Jul 23, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
Advertisement
प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा सरकार विचार करत नसल्याचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 20 जुलैपर्यंत 2.3 कोटी रिटर्न भरले गेले असून ही संख्या वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. 31 जुलैपर्यंत बहुतांश रिटर्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 5.89 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. आयटीआर भरण्याची ही वाढलेली तारीख होती. प्रत्येकवेळी तारखा वाढवल्या जातील, असा विचार लोक करत असल्यामुळे सुरुवातीला रिटर्न भरण्याची गती संथ होती. पण आता दररोज 15 लाख ते 18 लाखांपर्यंत परतावा मिळत असल्याचे बजाज म्हणाले.
Advertisement
Advertisement
Next Article