For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही : उद्धव ठाकरे

05:28 PM Dec 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
राम मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही   उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray question
Advertisement

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण न मिळाल्य़ाच्य़ा कारणावरून जोरदार राजकीय चर्चा सुरू असताना उद्धव यांनी आपल्याला राम मंदिरात जाण्यासाठी कोणाच्याही निमंत्रणाची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आ माजी मुख्यमंत्री उद्धव यांना निमंत्रण दिलेले नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Advertisement

आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "राम लल्ला माझाही आहे. मी माझ्या इच्छेनुसार कधीही जाऊ शकतो. मी आता जाऊ शकतो...मी उद्या जाऊ शकतो. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हाही मी अयोध्येला गेलो होतो. त्याआधीही मी अयोध्येला गेलो होतो. हे खर आहे कि मला आमंत्रण मिळाले नाही आणि मला त्याची गरजही नाही. माझी फक्त एकच विनंती आहे की हा धार्मिक कार्यक्रम राजकिय बनवू नये." आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, "ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते आज हयात नाहीत. कदाचित त्यांच्यापैकी काही जण असतील. तर काही लोक त्यावेळी शाळेच्या सहलीला गेले असतील कारण त्यावेळी त्याच वयाचे होते," असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Advertisement

Advertisement
Tags :

.