कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप नाही : अमेरिका

06:22 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी केले स्पष्ट

Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

एकीकडे पाकिस्तानसोबत भारताचा सैन्य तणाव वाढत असताना जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने तटस्थ भूमिका घेतली आहे. परंतु अमेरिकेने पहलगाम हल्ल्याची निंदा करत दहशतवाद विरोधात भारताला सहकार्य करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मध्यस्थी टाळण्याचे संकेत देत अमेरिकेने पाकिस्तानला एकप्रकारे झटका दिला आहे. कारण पाकिस्तान आता हा संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेला हस्तक्षेपासाठी गळ घालत होता.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्यासह अनेक नेत्यांनी भारत आणि पाकिस्तानसोबत अमेरिकेचे एकसारखे संबंध असल्याचे संकेत दिले आहेत. तर उपाध्याक्ष जेडी वेन्स यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान फसण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

आमचे देणेघेणे नाही : वेन्स

आम्ही भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. परंतु आम्ही या दोन्ही देशांच्या संघर्षात अडकणार नाही, कारण मूळ स्वरुपात आमचे याच्याशी कुठलेच देणेघेणे नाही. तसेच हा संघर्ष  अमेरिका नियंत्रित करू शकतो की नाही याच्या क्षमतेशीही याचे देणेघेणे नाही असे उद्गार वेन्स यांनी एका मुलाखतीत काढले आहेत.

शस्त्रास्त्रs खाली ठेवा असे अमेरिका भारत आणि पाकिस्तानला सांगू शकत नाही. याचमुळे आम्ही कूटनीतिक मार्गाने स्वत:चे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तणाव कुठल्याही व्यापक युद्धात रुपांतरित होणार नाही अशी अपेक्षा आहे. तसेच आण्विक युद्ध होण्याची शक्यताही दिसून येत नसल्याचे वेन्स यांनी म्हटले आहे.

अमेरिकेची भूमिका स्पष्ट

वर्तमान तणावपूर्ण स्थितीत अमेरिका भारत आणि पाकिस्तान यापैकी कुणा एकाची बाजू घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अमेरिकेचे पाकिस्तान आणि भारत दोघांसोबत चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांनी परस्परांसोबत मिळून काम करावे आणि हा तणाव दूर व्हावा अशी माझी इच्छा आहे. याप्रकरणी जर मी काही करू शकतो तर निश्चितपणे करणार असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.

अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांची भूमिका

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. यावेळी रुबियो यांनी सीमापार दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले तसेच पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीच्या पाकिस्तानच्या मागणीचे समर्थनही केले.

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article