For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाऊसिंग प्रकल्पाला नाही, भूखंड पाडण्यास परवानगी

12:41 PM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
हाऊसिंग प्रकल्पाला नाही  भूखंड पाडण्यास परवानगी
Advertisement

सर्वण कारापूर संरपंचांचे स्पष्टीकरण : ग्रामसभेत गदारोळ,ग्रामस्थांची मोठी गर्दी,मामलेदारांसह, पोलीस फौजफाटाही तैनात

Advertisement

डिचोली : कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय बनलेल्या अभिनंदन लोधा हाऊसिंग स्टार प्रकल्पाचा विषय ग्रामसभेसमोर आला असता यावेळी मोठा गदारोळ झाला. त्यावेळी मामलेदारांनी हस्तक्षेप करत शांततेत विषय मांडून चर्चा करण्याची सूचना केली. त्यानंतर पंचायतीकडे अद्याप या प्रकल्पाची फाईलच आलेली नाही, तर त्या प्रकल्पाला परवानगी देण्याचा प्रŽच येत नसून या जागेत केवळ भूखंड पाडण्यासाठी परवानगी दिलेली आहे, असे स्पष्टीकरण कारापूर सर्वणच्या सरपंच तन्वी सावंत तसेच सचिव महादेव नाईक यांनी दिला.

कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या अभिनंदन लोधा यांच्या हाऊसिंग स्टार प्रोजेक्टच्या विषयावरून कारापूर सर्वण पंचायतीची ग्रामसभा बरीच तापण्याची शक्मयता होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विषय उद्भवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला होता. तसेच ग्रामसभेस्थळी संयुक्त मामलेदारही उपस्थित होते. ग्रामसभेत सिद्धेश तारी, प्रितेश साळगावकर व इतरांनी सर्व्हे क्र. 148/0 या जमिनीतील 4 लाख 26 हजार चौरस मीटर जागेत कुळण येथे येणाऱ्या अभिनंदन लोधा हाऊसिंग स्टार प्रकल्पाला कशा प्रकारे मंजुरी दिली, असा प्रश्न विचारला. या विषयावर पंचायत सचिव महादेव नाईक यांनी व्यवस्थित उत्तर देत हा संपूर्ण विषयच गुंडाळला. या प्रकल्पाची फाईलच अद्याप मंजुरीसाठी पंचायतीमध्ये आलेली नाही. त्यामुळे त्याला ना हरकत देण्याचा विषयच नाही. या जागेत भूखंड पाडण्याच्या प्रक्रियेलाच पंचायतीने ना हरकत दिली आहे, असे सचिवांनी सांगितल्याने या विषयावर गोंधळ उडला.

Advertisement

मामलेदारांच्या इशाऱ्यानंतर गोंधळावर नियंत्रण

या ग्रामसभेत गोंधळ उडण्याची शक्मयता लक्षात घेऊन पोलीस फौजफाट्यासह डिचोलीचे संयुक्त मामलेदारही उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होऊन एक एक विषय येताच बराच गोंधळ होत होता. एक दोनदा पोलिसांना सभागृहात बोलावून ग्रामस्थांमध्ये घडलेला वाद मिटवावा लागला. तसेच लोधाच्या विषयावर सभागृहात बराच गदारोळ झाला. या प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यांनीही सभागृहात गर्दी केली होती. त्यामुळे प्रकल्पाचे समर्थक व विरोधकांमध्ये शाब्दीक वाद झाला. यावेळी सभागृहाबाहेर उपस्थित संयुक्त मामलेदारांनी सभागृहात येत शांततेत विषय मांडून चर्चा करण्याची सूचना केली. जास्त गोंधळ घालून हमरीतुमरीवर गेल्यास सभागृहाच्या बाहेर काढले जाईल, असा थेट इशाराच दिला. त्यामुळे काहीसा गोंधळ कमी झाला.

गोंधळातच गुंडाळली ग्रामसभा

अभिनंदन लोधा हाऊसिंग स्टार प्रकल्पाच्या विषयावर ग्रामसभेत गोंधळ सुऊ होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सरपंच तन्वी सावंत यांनी ग्रामसभा अन्य काही विषय नसल्याने तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या विषयाविरोधात जोरदार बाजू मांडण्यासाठी आलेल्या विरोधकांना आपली बाजू योग्यप्रकारे मांडताच आली नाही.

प्रतापसिंह राणे व विश्वजित राणे यांचे अभिनंदन

कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रात कचऱ्यासाठी एमआरएफ शेड उभारण्याची मोठी समस्या होती. परंतु त्यासाठी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व मंत्री विश्वजित राणे यांनी जागा दिल्याने त्यांचे अभिनंदन करत असल्याचे सरपंच तन्वी सावंत यांनी म्हटले.

विठ्ठलापुरात सीलबंद पाण्याच्या प्रकल्पाचा परवाना बेकायदा

विठ्ठलापूर भागात भरवस्तीत एका वास्तुत सीलबंद पाणी प्रकल्पाला बेकायदेशीर परवाना दिला आहे. काजीवाडा येथील घराच्या क्रमांकावर या प्रकल्पाला कोणत्या आधारे परवाना दिला आहे? असा प्रश्न सिद्धेश तारी यांनी केला. यावरही ग्रामसभेत गोंधळ उडाला ग्रामस्थांमध्येच वादाचा फैरी झडल्या.

गटरांचा विषयही ग्रामसभेत गाजला

कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील गटरांचाही विषय ग्रामसभेत गाजला. नरेंद्र जोगले यांनी या विषयावर लक्ष वेधले. यावेळी उपसरपंच दिव्या नाईक, पंचसदस्य दामोदर गुरव, योगेश पेडणेकर, लक्ष्मण गुरव, बिदिया सावंत, बीबी आयेशा जमीर मगोड, उज्ज्वला कवळेकर, ज्ञानेश्वर बाले यांची उपस्थिती होती.

Advertisement
Tags :

.