५३ ठिकाणी नो हॉकर्स तर ३६ ठिकाणी झोन निश्चित
सांगली :
सांगतीतील सिव्हील हॉस्पिटल रोडवर मुंबई जमखंडी या एसटीखाली सापडून झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सांगली, मिरज व कुपवाड शहरातील फेरीवाले, भाजीविक्रेते व हातगाडीवाले यांच्याकडून होणारे अतिक्रमण रोखण्याच्या दृष्टीने शहर पथविक्रेता आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात ५३ ठिकाणी नो हॉकर्स तर ३६ ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. तर एसटी बसेस ये जा करणाऱ्या मार्गावर कोणत्याही परिस्थितीत फेरीवाले आणि हातगाडयांना परवानगी देण्यात येणार नसून फेरीवाल्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतर मनपाच्यावतीने शहरात अतिक्रमण हटावाची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. आठवडा बाजार सरसकट न हलवित्ता वाहतुकीला अडथळा होणारे बाजारच अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगितले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त स्मृती पाटील यावेळी उपस्थित होते.
मनपाने केलेल्या सर्वेक्षनात पालिका क्षेत्रात २०२३ अखेर फेरीवाल्यांची संख्या ३८३९ असल्याचे दिसून आले. फेरीवाल्यांची आता नव्याने नोंदणी होत नाही फेरीवाल्याचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने १८ लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रात विक्रेता, नवविक्रेता झोन करण्यासाठी प्रभागनिहाय फेरीवाल्यांसाठी रिकामे भूखंड विकसीत केले जाणार आहेत. यासाठी स्वताः आयुक्तांसह उपायुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित केल्या आहेत. आठवडी बाजारामुळे वाहतुक प्रश्न पार्किंग व्यवस्था याही बाबी विचारात घेण्यात येणार आहेत. ट्रैफिक पोलीसांशीही सल्लामसलत करण्यात येणार आहे.
मनपा क्षेत्रात अपघाताला निमंत्रण देणाऱ्या विशेषतः एसटी बसेस ये जा करणाऱ्या मार्गावर हातगाडया आणि फेरीवाल्यांना परवानगी देण्यात येणार नसून फुटपाथवर व्यवसाय करण्यासाठीही कोणाला बसू देणार नाही. फुटपाथ पुर्णपणे मोकळे करण्यात येणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होती अशा ठिकाणचे आठवडा बाजार योग्य त्या ठिकाणी स्वतंत्र करण्यात येणार असून शनिवारचा मेनरोड कापड पेठ येथील बाजार हलविण्यात येणार नाही. तथापि कापड पेठेशिवाय हरभट रोडवर कोणत्याही फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.
सांगलीत दोन व कुपवाड आणि मिरजेत प्रत्येकी एक एक अशा एकूण नवीन चार खाऊ गल्या तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लोकांना एकत्रितपणे खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतील, तसेच यामुळे छोटया मोठ्या व्यावसायिकांनाही चार पैसे मिळतील. रात्रीच्या वेळी शहरात कशाही हातगाडया लागणार नाहीत फेरीवाले व हातगाडांना दहा दिवसांची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमण हटावाची मोहिम राबविण्यात येणार आहे. वाहन जत्रा जुन्या दुचाकीचे व्यवसाय करणाऱ्यासह दुकानापुढे अतिक्रमण केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
- कुपवाड नो हॉकर्स झोन
भारत सूतगिरणी चौक ते लक्ष्मी मंदिर चौक, कुपवाड जकात नाका ते भारत सुतगिरणी वारणाली विद्यानगर विजयनगर ते रेल्वे पुल, लक्ष्मी मंदिर चौक ते चिन्मय पार्क
- कुपवाड हॉकर्स झोन
सूतगिरणी चौकातीत उत्तरेकडील जागा, सार्वजनिक बांधकामच्या रस्त्याच्या उत्तरेकडील रस्ता, पोंडीकाका कॉम्लेक्स, महावीर व्यापाम शाळा खुली जागा, वारणाली गल्ली क्रमांक एक ते पाच, सत्राळकर बिल्डिंग पर्वकडील खुली जागा, विजयनगर साळुंखेच्या परासमोरील खुली जागा लक्ष्मीमंदिर चौक ते चिन्मय पार्क, मंगळवार बाजार,
- मिरज नो हॉकर्स झोन
गांधी पुतळा चौक ते बॉम्बे बेकरी रस्ता ते पुढे लक्ष्मीमार्केट रस्ता, हिरा हॉटेल चौक ते श्रीकांत चौक किसान बौक ते शास्त्री चौक, मिरज एसटी स्टॅन्ड ते गिरासाहेब दर्गा, गांधी बौक ते बसवेश्वर चौक, नियाजी चौक ते चौम्ये बेकरी, आण्णाभाऊ साठे बौक ते गाडने चौक, बालगंधर्व नाट्यगृह ते आळतेकर हॉल, लक्ष्मीमार्केट ते शास्त्री चौक, सिव्हिल हॉस्पिटल ते शिवाजी रोह, हिरा हटित ते बंटमुरे कॉर्नर अआंबेडकर गार्डन ते गुलाबराव पाटील कॉलेज, मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत व तेथून स्टॅन्ड
- मिरज हॉकर्स झोन
गवळी कट्टा, लक्ष्मी मार्केट इमारतीच्या पूर्व पश्चिम रस्ता, सामाजिक भवन ते स्टॅन्ड जवळ मिरज व डॉ. बाचासाहेब आंबेडकर उद्यान
- सांगली नो हॉकर्स झोन
मनपा मुख्यालय ते टिळक चौक एसटी स्टॅन्ड ते शिवाजी महाराज पुतळा व रेवणी रोड, एसटी स्टॅन्ड ते भारती विद्यापीठ, शास्त्री चौक ते झुलेलाल चौक स्टॅन्डसमोरील बाजू भारती विद्यापीठ ते राजवाडा चौक ते आझाद चौक, भारती विद्यापीठ ते प्रसूती गृह ते तानाजी चौक, रिसाला रोड ते संपूर्ण पंचमुखी मारुती रोड, रिसाता रोड हिराबाग कॉर्नर ते बदाम चौक स्टेशन चौक काँग्रेस भयन चौक, राजबाला चौक, स्टेशन चौक, शिवशंमी चौक, शास्त्री चौक, झुलेलाल चौक, आपटा पोलीस चौकी ते बायपास रोड, मार्केटयार्ड ते गोकुळनगर, निमुर्ती कॉलनी ते विश्रामबाग गणपती मंदिर चौक, मंगलयाम ते सिव्हिल हॉस्पिटल रोड, पुष्पराज बौक ते राममंदिर बौक काँग्रेस मवन व विश्रामबाग चौक, राममंदिर कॉर्नर ते सिव्हिल व शंभर फुटी, घाटगे पाटील शोरूम रोड ते दिगंबर मेडीकत, वालचंद कॉलेज ते संपूर्ण शंभर फुटी रोड, झूलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटत्त ते पुष्पराज चौक रस्ता, राममंदिर बौक, पुष्मराज बौक, विश्रामबाग चौक, आलदर चौक व सिव्हिल हॉस्पिटल चौक.
- सांगली हॉकर्स झोन
एसटी स्टॅन्ड ते वैरण बाजारची खुली जागा स्टॅन्डची दक्षिम उत्तर खुली जागा, टिळक चौक बाजार समितीची खुली जागा, खणमाग अॅन्टी करप्शन कार्यालयाजवळील पोलीस विभागाची खुली जागा स्टेशन रोड विवाह नोंदणी कार्यालय जवळील व मनपा ऑफीसच्या उत्तरेकडील जागा, शास्वी चौक उत्तर बाजू पुर्व व आतील बाजू पत्रकारनगर घाटगे पाटील शोरूम समोर लोकमान्य मंडळासमोरील खुली जागा, शाहू उद्यान एसटी स्टॅन्ड जवळ उद्यानाच्या उत्तर बाजुचा पूर्व पश्चिम रस्ता, दीनानाथ नाट्यगृह ते राणी सरस्वती शाळा बोळ, ८० फुटी खुली जागा, शंभर फुटी खुले नाटयगृद्ध काळया खणीजवळील जागा, बापट मळा, महावीर उद्यान, सावरकर कॉलनी खुती जागा, शामरावनगर ते कोल्हापुर रोड, धामणी चौक, कॉलेज कार्नरव्या दक्षिणेकडील पुर्व पश्चिम रस्ता, काँग्रेस मवनसमोरील बोळ, विश्वामचाग दडिकर मॉलसनौरीत खुली जागा