कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara News: साताऱ्यात अतिक्रमणांना अभय कोणाचे?, 'तो' माजी नगरसेवक कोण?

12:17 PM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका व्यावसायिकाने आपले दुकानच 'नो हॉकर्स झोन मध्ये थाटल्याची चर्चा 

Advertisement

सातारा : साताऱ्यात कितीही नियम बनवा, कितीही बंधने तयार करा, मोडण्यासाठी लगेच सातारकर तयार असतात. 'नो हॉकर्स झोन पालिकेने तयार केला. मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करताना पालिकेच्या अतिक्रमण विभाग व मुख्याधिकारी अभिजित बापट यांना विविध संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Advertisement

असे असताना आता एका माजी नगरसेवकाच्या कृपेने चक्क एका व्यावसायिकाने आपले दुकानच 'नो हॉकर्स झोन मध्ये थाटल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, एसटी स्टॅण्ड ते तहसील कार्यालय या दरम्यान रस्त्यावर टपऱ्या सुरु करणाऱ्यांवर वाहतूक शाखेची करडी नजर आहे.

पालिकेने उचलली कायदेशीर कारवाईची पावले

शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमण असली तरीही कोणाचे तरी घरसंसार चालत असल्याने बहुतांशी याकडे प्रशासन कानाडोळा करत आले आहे. मोती चौक ते पाचशे एक पाटी दरम्यानचा रस्ता हा तेथील नागरिकांच्या मागणीनुसारच 'नो हॉकर्स झोन' पालिकेने घोषित केला.

त्याची अंमलबजावणी १ मे पासून करण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही त्या ठिकाणी विक्रेते बसत होते. पालिकेने कारवाई करण्याची भूमिका घेतली. पालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचीही पाऊले उचलली.

दरम्यान, पालिकेने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हॉकर्स संघटना व इतर संघटनांनी विरोध दर्शवला होता, परंतु पालिकेने एकदा काढलेल्या आदेशापुढे व निर्णयापुढे त्यांचे काही चालले नाही. मात्र, जुन महिना गेला. जुलैच्या ७ तारखेला सकाळी त्याच नो हॉकर्स झोनमध्ये एक दुकान एका माजी नगरसेवकाच्या कृपेने लागल्याचे चित्र दिसले.

त्यामुळे आता पालिका संबंधितावर गुन्हा दाखल करणार काय?, कायदेशीर कारवाई करणार काय?, असा सवाल उपस्थित होत असून जर त्या दुकानदारास परवानगी दिली जात असेल तर त्या रस्त्यावर सर्वच हॉकर्स धारकांना आपली दुकाने थाटण्याची परवानगी देवून तेथे नो व्हेईकल झोन करावा, अशी मागणी होवू लागली आहे.

त्याची अंमलबजावणी दि. ९ जुलैपासून करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, दुसरीकडे सातारा बसस्थानक ते तहसिल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रस्त्याच्याकडेने काही विक्रेते आपली दुकाने थाटत असतात. वाहतूकीला अडथळा करत असतात.

अशा विक्रेत्यांवर वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेचे पथक करडी नजर ठेवून आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता स्टॅण्डच्या समोर रस्त्याकडे लागलेले हातगाडे काढण्यास त्यांनी भाग पाडले. ही कारवाई सतत सुरु असते असे वाहतूक शाखेकडून संबंधितांना सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
_satara_news# traffic rules#Atikraman#Encroachment#Muncipal carporation#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediasataraSatara Policetraffic department
Next Article