For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात नको, द्रविड मॉडेलचा अवलंब करा : कमल हसन

06:39 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात नको  द्रविड मॉडेलचा अवलंब करा   कमल हसन
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

अभिनेता आणि मक्कल नीधि मय्यमचे संस्थापक कमल हासन यांनी एका मोठ्या सभेला संबोधित केले आहे.  देशाने गुजरात मॉडेलऐवजी तामिळनाडूचे द्रविड मॉडेल अवलंबिण्याची गरज आहे. पूर्ण देशात महिलांना बसमधून मोफत प्रवास करता यावा आणि त्यांना दर महिन्याला 1 हजार रुपये मिळावेत असे कमल यांनी म्हटले आहे. द्रमुकचे चेन्नई दक्षिण मतदारसंघातील उमेदवार थमिझाची थंगापांडियन यांच्या समर्थनार्थ मायलापूर येथे त्यांनी सभेला संबोधित पेले आहे.

भारताने द्रविड मॉडेलचे पालन केले तर देश अधिक विकसित होणार आहे. छोटे व्यवसाय बंद असताना मोफत प्रवास उपयुक्त ठरला आणि महिलांना कामावर जाण्यास मदत मिळाली असे उद्गार कमल हासन यांनी काढले आहेत.

Advertisement

कमल हासन यांचा पक्ष तामिळनाडूतील सत्तारूढ द्रमुकच्या आघाडीत सामील आहे. याचमुळे हासन यांनी लोकांना द्रमुक उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण चेन्नई हा मतदारसंघ मी द्रमुककडे मागितला असता तर मला मिळाला असता. परंतु मी येथे माझ्या बहिणीच्या प्रचारासाठी आलो आहे. या मतदारसंघात आमच्या बहिणीला विजयी करायचे. विजयानंतर मी निश्चितपणे पुन्हा या मतदारसंघात येणार आहे. हा विजय आमच्या देशासाठी महत्त्वाचा असल्याचा दावा कमल हासन यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.