For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरसंघचालकांच्या दौऱ्यावेळी ‘नो फ्लाय झोन’ची घोषणा

07:10 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरसंघचालकांच्या दौऱ्यावेळी ‘नो फ्लाय झोन’ची घोषणा
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, कडक सुरक्षा व्यवस्था

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्यांचे वास्तव्य व कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे. या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, मानवरहित हवाई उपकरणे उडविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. सोमवार दि. 6 ते मंगळवार दि. 14 जुलैपर्यंत सरसंघचालकांचे बेळगावात वास्तव्य असणार आहे. फौंड्री क्लस्टर गेस्ट हाऊस, अनगोळ औद्योगिक वसाहत, उद्यमबाग, संत मीरा हायस्कूल, सह्याद्री कॉलनी, भाग्यनगर एक्स्टेन्शन, अनगोळ, जगन्नाथराव जोशी स्मारक भवन, गुड्सशेड रोड, शास्त्राrनगर, खडेबाजार, आदी ठिकाणी ते कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

सरसंघचालकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वास्तव्य व कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत रेड झोन किंवा नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स व मानवरहित हवाई उपकरणे उडविण्यास निर्बंध असणार आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असून सरसंघचालकांच्या बेळगाव येथील वास्तव्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.