महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावला इलेक्ट्रिक बसची हुलकावणी

11:44 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणपूरक बसची प्रतीक्षा : पाच फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्तावही मंजुरीविना

Advertisement

बेळगाव : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसने बेळगावला अद्याप हुलकावणी दिलेली आहे. बेळगाव परिवहन विभागाने इलेक्ट्रिक बससाठी वायव्य परिवहन मंडळाकडे याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. मात्र बहुप्रतिक्षीत असलेल्या इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा अद्याप लागली आहे. बेंगळूर, म्हैसूर शहरामध्ये इलेक्ट्रिक बस सुसाट धावू लागली आहे. त्याबरोबर बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, हुबळी शहरातही इलेक्ट्रिक बस धावणार असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्याप बेळगावला इलेक्ट्रिक बसपासून वंचित रहावे लागले.

Advertisement

प्रवास अधिक सुरळीत 

करण्यासाठी बसेस महत्त्वाच्या शासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये इलेक्ट्रिक बस चालविण्याचा उद्देश आहे. त्याबरोबर बेळगाव विभागाने इलेक्ट्रिक बसबरोबर पाच फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे दिसत आहे. परिवहनच्या ताफ्यात नादुरूस्त बसेसची संख्या जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. शहरातंर्गंत प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस महत्त्वाच्या ठरतात. मात्र अद्याप बेळगाव परिवहनला इलेक्ट्रिक बसपासून दूर रहावे लागले आहे.

परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता 

परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने सार्वजनिक बससेवेचे तीन तेरा वाजले आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. मात्र तुलनेत बसेसची कमतरता असल्याने प्रवास धोकादायक ठरू लागला आहे.

प्रक्रियेनंतर इलेक्ट्रिक बस देणार 

परिवहन महामंडळातर्फे एकूण 350 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनुदानाअभावी ही प्रक्रिया काहींसी लांबणीवर पडली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस दिल्या जातील.

- बस एम. प्रियंगा (व्यवस्थापकीय संचालक कर्नाटक रोड ट्रॉर्न्स्पोट कॉर्पोरेशन)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article