For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ना डिझेल, ना वीज... गॅसवर धावणार रेल्वे!

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
ना डिझेल  ना वीज    गॅसवर धावणार रेल्वे
Advertisement

भारतीय रेल्वेची मोठी योजना, हायड्रोजन इंजिनचा पहिला प्रोटोटाईप डिसेंबरपर्यंत होणार सज्ज,टेनची पहिली ग्राउंड टेस्ट येत्या जानेवारीत अपेक्षित.यशस्वी चाचणीनंतर 35 रेल्वेंची ऑर्डर दिली जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय रेल्वे सध्या बदल आणि अपग्रेडेशनच्या मार्गावर आहे. डिझेल इंजिनची जागा कोळशाच्या इंजिनांनी घेतली, नंतर डिझेलच्या जागी इलेक्ट्रिक इंजिन बसवण्यात आले. आता त्यातही सुधारणा करत गॅस इंजिनच्या रेल्वेगाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय रेल्वेने या टेनच्या चाचणीसाठी जानेवारी 2025 मध्ये अंतिम मुदत दिली आहे. याआधी त्याचा पहिला प्रोटोटाईपही डिसेंबरपर्यंत तयार होईल. यामुळे इंधनाच्या टंचाईवर मात तर होईलच, शिवाय गाड्यांचा वेगही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement

देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या टेनची चाचणी जानेवारी 2025 पर्यंत केली जाईल, असे या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा प्रोटोटाईपही डिसेंबरपर्यंत तयार होईल. याद्वारे सध्या सुरू असलेले डिझेल इंजिन बदलून त्याच्या जागी हायड्रोजन इंजिन बसविण्यात येणार आहे. 1200 किलोवॅट क्षमतेच्या डिझेल इंजिनला हायड्रोजन इंधन सेल आधारित इंजिनमध्ये रुपांतरित करण्याची रेल्वेची योजना आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी

हायड्रोजन पॉवर इंजिन बसवून प्रदूषणावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. हायड्रोजन टेनचे इंजिन त्याचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करते. डिझेल इंजिनच्या तुलनेत हायड्रोजन गाड्यांमुळे खूपच कमी प्रदूषण होईल. आम्ही इंधन (फ्युएल) सेलवर आधारित टेन बनवण्याची तयारी करत आहोत. यामध्ये हायड्रोजन फ्युएल सेलमधून ट्रॅक्शन एनर्जी उपलब्ध केली जाईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

इंधन सेल म्हणजे काय?

इंधन सेल हे एक असे उपकरण आहे जे रासायनिक अभिक्रियाद्वारे वीज निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर करते. यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि या प्रक्रियेत इलेक्ट्रोलिसिसमुळे पाणी उप-उत्पादन म्हणून तयार होते. अशाप्रकारे, पुरेशी वीज उपलब्ध होते आणि प्रदूषण निर्माण होत नाही.

35 टेन सेट बनवणार

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून याची चाचणी सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रत्येकी 6 डब्यांसह 35 टेन संच तयार केले जातील. हायड्रोजन इंधन सेल बनवण्यासाठी बॅटरी आणि इंधन सिंक्रोनायझेशन चाचणी पूर्ण झाली आहे. ग्लोबल मेजर सेलच्या रचनेलाही मंजुरी मिळाली आहे. याशिवाय हायड्रोजन प्लान्टला पेट्रोलियम आणि एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडूनही मान्यता मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.