Kasaba Beed मध्ये 328 मतांनी अविश्वास ठराव मंजूर, ठरावासाठी एकूण 1834 मतदारांची नोंदणी
लोकनियुक्त सरपंचांवर 12 पैकी 11 सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता
By : विश्वनाथ मोरे
कसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रक्रियेमध्ये 17 जुलै रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत अविश्वास ठरावा संदर्भात नोंदणी होऊन 11 ते 4 या वेळेमध्ये मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी उत्स्फूर्तपणे 1834 इतक्या मतदारांची नोंदणी झाली. 6 वॉर्डमध्ये ठरावाच्या बाजूने शून्य व ठरावाच्या विरुद्ध त्रिकोण या चिन्हाच्या आधारे मतदान घेण्यात आले.
या निवडणूकीच्या मतमोजणीला सांयकाळी चारनंतर सुरवात होऊन यामध्ये 1834 पैकी 1809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 1041 मते व ठरावाच्या विरुद्ध बाजूने 713 इतकी मते मिळाली. 55 मते खराब होऊन 328 मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांच्यावर 12 पैकी 11 सदस्यांनी हा अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यावेळी सरपंच उत्तमराव वरुटे यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले नाही, ते मनमानी कारभार करतात असे आरोप करत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच महेश जोगडे, जयसिंग सुर्यवंशी, विनय गावडे, संतोष पाटील, सागर पाटील, माधुरी पाटील, माया जोगडे, सरिता खांडेकर, रंजना तिबीले, अंजना कुंभार, प्रियांका जाधव या सदस्यांनी हा विश्वासदर्शक ठराव दाखल केला होता.
गुरुवारी 17 जुलै आज रोजी निवडणूक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे व अधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. करवीर पोलीस प्रशासनाकडून करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे, गोपनीयचे अविनाश पवार , कसबा पोलिस पाटील पंढरीनाथ ताहसिलदार, सर्व पोलीस व कर्मचारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणुकीत प्रक्रियेसाठी कार्य केले.
त्यामुळे लोकनियुक्त सरपंचावर झालेला अविश्वास ठराव निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी 130 कर्मचारी यामध्ये पंचायत समिती, ग्रामसेवक, महसूल, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा समावेश होता.