For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या शनिवारी ‘नो बॅग डे’

06:26 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
येत्या शनिवारी ‘नो बॅग डे’
Advertisement

बेळगाव : विद्यार्थ्यांवरील दफ्तरांचा भार कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक विषयांवर जागृती व प्रबोधन केले जाणार आहे.

Advertisement

जुलै 2026 मध्ये अमलीपदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम व प्रतिबंध याविषयी जागृती केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात एक विषय निवडण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा, निरोगी जीवनशैली, इंटरनेटचा वाढता वापर, कचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर जागृती केली जाणार आहे. शनिवार दि. 18 रोजी तिसरा शनिवार असल्याने त्यादिवशी अमलीपदार्थांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे. सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जावा, अशा सूचना ग्रामीण गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

Advertisement

Advertisement

.