For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएमडीसीचा समभाग निकालानंतर तेजीत

06:54 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएमडीसीचा समभाग निकालानंतर तेजीत
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

खाण उत्पादन क्षेत्रातील सरकारी कंपनी एनएमडीसी यांचा समभाग मंगळवारी शेअर बाजारात दोन टक्क्यांहून अधिक तेजीत होता. मार्च तिमाहीतील निकालानंतर समभागांच्या भावावर सकारात्मक परिणाम पहायला मिळाला. याच दरम्यान कंपनीने आर्थिक वर्ष 2027 मध्ये 6 कोटी टन उत्पादनाचे लक्ष निर्धारित केले असल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली.

एनएमडीसीचा समभाग मंगळवारी इंट्रा डेदरम्यान 2.7 टक्के वाढत 95 रुपयांवर व्यवहार करत होता. याच दरम्यान बीएसई सेन्सेक्स मात्र 0.4 टक्के तेजी दाखवत होता. कंपनीने मार्च तिमाहीमध्ये उत्पादन, विक्री व नफ्यामध्ये चांगली कामगिरी नोंदवली होती. व्यवस्थापनानेदेखील पुढील काही वर्षांमध्ये उत्पादनात वाढीसोबतच नव्या व्यवसायात उतरण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम कंपनीच्या समभागावर शेअर बाजारात सकारात्मक पहायला मिळाला.

Advertisement

उत्पादन, नफा किती

मार्च तिमाहीत एनएमडीसीचे लोह खनिज उत्पादन 22 टक्के वाढीसोबत 1.63 कोटी टनवर पोहोचले. विक्री 21 टक्के वाढीसोबत 1.53 कोटी टन इतकी राहिली. उत्तम उत्पादन व मजबूत मागणीचा फायदा कंपनीने नफ्याच्या रुपामध्ये उठविला. कंपनीचा नफा 26 अब्ज रुपयांचा राहिला. निव्वळ नफा 19.5 अब्ज रुपयांचा झाला असून मागच्या वर्षांच्या तुलनेमध्ये निव्वळ नफा 31 टक्के वाढला आहे. संपूर्ण 2025-26 आर्थिक वर्षात 284 अब्ज रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. निव्वळ नफा याच वर्षात 72.2 अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. वर्षाच्या आधारावर 32 टक्के वाढ नफ्यात दिसली.

Advertisement
Tags :

.