1980 नंतर हिंदी महासागरात नायट्रोजन प्रदूषण दुप्पट
सागरी जीवांसाठी मोठा धोका
1980 नंतर पासून भारतात मानवीय घडामोडींमुळे नायट्रोजन प्रदूषणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. याचबरोबर बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारी क्षेत्रांमध्ये नायट्रोजन जमा होण्याच्या प्रकारात उल्लेखनीय वृद्धी दिसून आली आहे. फ्रंटियर्स इन मरीन सायन्स नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात दक्षिण आशियामध्ये वायू प्रदूषण सागरी पर्यावरणीय व्यवस्थेला कशाप्रकारे प्रभावित करत आहे हे मांडण्यात आले आहे.
जीवाश्म इंधनाचा वापर आणि कृषी घडामोडींतून उत्सर्जित नायट्रोजन उत्तर हिंदी महासागराला कशाप्रकारे प्रभावित करत आहे हे यात नमूद करण्यात आले आहे. फ्रान्सच्या सोरबोन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे अध्ययन केले आणि नायट्रोजनमुळे महासागराची जैविक उत्पादकता प्रभावित होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. परंतु महासागरात खतांसारख्या प्रक्रिया नायट्रोजन जमा होण्याच्या प्रभावाला संतुलित करू शकतात असे संशोधकांना आढळून आले आहे. विशेष रुपाने मध्य अरब समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पश्चिम हिस्स्यांमध्ये महासागराची पातळी हळूहळू वाढत असून तेथे नायट्रोजनचे प्रमाण 70-100 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
हवामान बदलाचा प्रभाव
महासागरात प्रारंभिक जैव उत्पादकतेचे तात्पर्य अशा सुक्ष्म जीवांशी आहे, जे प्रकाश संश्लेषण किंवा रासायनिक प्रक्रियांच्या माध्यमातून ऊर्जेचा वापर करून कार्बनिक पदार्थांची निर्मिती करतात. हवामान बदलामुळे समुद्राच्या तापमानात वाढ झाली असून यामुळे जलपातळी वाढली आणि पाण्याचे घनत्व-आधारित स्तर निर्माण झाले.
धुळीत लोहाचे कण
मान्सून देखील या जटिलतेला आणखी वाढवतात, हे महासागराचा पृष्ठभाग आणि खोलवर पोषक घटकांच्या प्रवाहाला प्रभावित करते, ज्यामुळे प्रारंभिक आणि द्वितीयक उत्पादकांना आवश्यक पोषक घटक मिळतात. अरब क्षेत्रातून येणाऱ्या धुळीत असलेले लोहाचे कण देखील या प्रक्रियेला वेग देतात.
पोषक घटकांमध्ये कमतरता
संशोधकांनीक कॉम्प्युटर मॉडलिंग आणि उपग्रहीय छायाचित्रांच्या मदतीने नायट्रोजन साठा आणि महासागराचे तापमान वाढण्याच्या प्रभावाचे विश्लेषण केले. प्रारंभिक फाइटोप्लँकटन (सागरी शेवाळ) आणि जूप्लँटकन (समुद्राती सुक्ष्म जीव, प्लवक आणि सुक्ष्म सागरी प्राणी)च्या उत्पादकतेयच काही स्थानांवर वेगाने वाढ झाली, तर काही क्षेत्रांमध्ये पोषक घटकांची कमतरता दिसून आली. विशेष स्वरुपात पश्चिम अरबी समुद्रात 100 मीटर खाली कार्बन अधिक असल्याची पुष्टी झाली, तर दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मध्य बंगालच्या महासागरात उत्पादकता सर्वात कमी राहिली. या क्षेत्रांमध्ये समुद्र तप्त असल्याने पोषक घटकांचा पुरवठा मर्यादित राहिला, ज्यामुळे नायट्रेट अधिक खोलवर पोहोचला असल्याचे आढळून आले आहे.