महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नितीनकाकांची खासदार पक्की मुंबईत अजितदादांच्या बंगल्यावर बैठक! आज अर्ज करणार दाखल

01:14 PM Aug 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Nitinkaka MP sure meeting at Ajit pawar
Advertisement

नितीनकाकांचा आयडी फोटो वापरणे
सातारा प्रतिनिधी

Advertisement

वाईचे माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे अध्यक्ष ‘नितीनकाकांना खासदार करणार’ असा शब्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी वाई येथील भाजी मंडईतील सभेत दिला होता. एकदा दादांनी शब्द दिला म्हणजे तो पूर्ण करणार, असे दादांच्या गोटातील कार्यकर्त्यांना हमी असते. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार राज्यसभेच्या खासदारकीच्या रिक्त दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. 21 ऑगस्ट असून त्याकरिता मुंबई येथे अजितदादांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठकीत नितीनकाकांचा अर्ज भरण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार काही कार्यकर्त्यांना कागदपत्रे तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून बुधवारी मुंबईमध्ये विधान भवनात नितीनकाकांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

Advertisement

खासदार उदयनराजे आणि पियुष गोयल या दोघांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. 14 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट अशी जाहीर करुन आवश्यक वाटल्यास दि. 3 सप्टेंबर रोजी मतदानाची तारीखही घोषित केली आहे. त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजेंच्या प्रचारावेळी वाई येथील भाजी मंडईच्या सभेत आपल्या भाषणातून ‘नितीनकाकांना खासदार करतो’, असा शब्द दिला होता. तो आता खरा होवू पाहात आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे हे निवडून आले. त्यांच्या विजयानंतर दादांनी दिलेला शब्द खरा होणार की दादा शब्द फिरवणार याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, अजितदादा हे बोलतात तसेच वागतात याचा प्रत्यय जिह्यातील जनतेला आहेच. त्यानुसार मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नितीनकाकांच्या कार्यकर्त्यांसोबत व जिह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यामध्ये नितीनकाकांचा अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. अजितदादांनी दिलेल्या शब्दानुसार लगेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तयारी सुद्धा करत कागदपत्रांची जुळवाजुळव केली असून दि. 21 रोजी नितीनकाकांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी कोणाचा अर्ज आला नाही तर नितीनकाका हे बिनविरोध खासदार होणार आहेत. त्यामुळे त्यांचे वडील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर वाई तालुक्यात खासदारकी नितीनकाकांच्या रुपाने येत आहे.

सोशल मीडियावर खासदार नितीनकाका पोस्ट
जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका यांचा राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी भरण्याचे आदेश मिळताच व बैठकीत निर्णय झाल्याची खात्री होताच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर खासदार नितीनकाका यांना अभिनंदन अशाच आशयाच्या पोस्ट पडू लागल्या आहेत.

खासदारकी आल्याने आणखी जबाबदारी वाढणार
लोकसभा निवडणुकीमध्ये तसे पाहता खासदार उदयनराजेंना नितीनकाकांच्या बोपेगाव गावातूनच मतदान कमी झाले आहे. वाई तालुका व वाई विधानसभा मतदारसंघातूनही मतदान कमी झाले. मतदानाचा टक्का घसरला असला तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत. रिक्त जागेवरुन भाजपाकडून दावा केला जात असला तरीही दुसरा सक्षम असा उमेदवार नसल्याने अजितदादा गटाकडून खमक्या पान बाहेर काढले आहे. काकांच्या खासदारकीमुळे सातारा जिह्यात महायुतीची ताकद वाढणार आहे, अशीही चर्चा सुरु आहे.

Advertisement
Tags :
ajit pawarMPmumbaiNitinkaka
Next Article