For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेंडूरचे सुपुत्र नितीन पवार यांना भारत सरकारचे दक्षता पदक

11:53 AM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पेंडूरचे सुपुत्र नितीन पवार यांना भारत सरकारचे दक्षता पदक
Advertisement

केंद्रीय तपास संस्थेत केले उल्लेखनीय कार्य ; नवी दिल्ली येथे गृहमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान

Advertisement

कट्टा / वार्ताहर

केंद्र सरकार यांच्या अधिपथ्याखालील महत्वाची मानली जाणारी भारत देशाची "केंद्रीय तपास यंत्रणा" या संस्थेमध्ये विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील पेंडूर- सोनारवाडी गावचे सुपुत्र नितीन वसंत पवार यांना भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे "दक्षता पदक" प्रदान करत गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे भारत देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आतंकवाद निरोधी संमेलन २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलन कार्यक्रमात पोलिस सेवा, केंद्रीय दले, सुरक्षा संस्था, गुप्तचर विभाग, फॉरेन्सिक सायन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा पदक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मालवण तालुक्यातील पेंडूर सोनारवाडी येथील नितीन पवार यांचा समावेश होता. यावेळी भारताचे गृहसचिव गोविंद मोहन, महासंचालक सदानंद दाते यांची विशेष उपस्थिती होती. नितीन पवार यांचे वडील वसंत पवार हे मूळ पेंडूर गावचे रहिवासी. ते मुंबई येथे पोलिस खात्यात कार्यरत होते. त्यामुळे नितीन यांचे पूर्ण शिक्षण मुंबई घाटकोपर येथे झाले. त्याचे भाऊ देखील मुंबई येथे पोलिस खात्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंबच मुंबईत वास्तव्यास असते. पण तरीही त्यांनी आपली नाळ आपल्या मूळ गावाशी कायम जोडून ठेवली. गावातील सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यात ते नेहमी आपले मोलाचे सहकार्य करतात. पेंडूर सारख्या ग्रामीण भागातील अनेक असे सुपुत्र महाराष्ट्रभर वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. शिक्षण विभाग, शेती विभाग, पोलिस विभाग, उद्योजक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत पेंडूर गावच्या सुपुत्रांनी आपल्या गावचे नाव उज्वल केले आहे. देशाच्या सीमेवर जाऊन देशसेवेसाठी देखील काम करणारे युवक पेंडूर गावातील आहेत. त्यात नितीन पवार यांनी भारत देशाच्या एका मोठ्या आणि जबाबदार संस्थेमध्ये एवढी अभिमानास्पद व कौतुकास्पद कामगिरी केली. व आपल्या कार्याने पेंडूर गावच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे पेंडूर गावचे नाव संपूर्ण देशात अभिमानाने घेतले जात आहे. पेंडूर गावातून नितीन पवार यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.