For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीन नबीन यांचा आमदारकीचा राजीनामा

06:07 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
नितीन नबीन यांचा आमदारकीचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावागी यांच्याकडे सादर केला आहे. संजय सरावागी यांनी सोमवारी हा राजीनामा बिहार विधानसभेचे अध्यक्ष प्रेम कुमार यांच्याकडे सादर केला. नितीन नबीन हे आसाममध्ये प्रचारात व्यस्त असल्याने ते व्यक्तीश: उपस्थित राहू शकले नाहीत.

राज्यसभेवर निवडून आल्यानंतर नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. ते पाटणाच्या बांकीपूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता बांकीपूरची जागा रिक्त झाली आहे. आता येथून पुढील आमदार कोण होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या जागेसाठी डॉ. संजय मयुख यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. संजय मयुख सध्या बिहार विधान परिषदेचे सदस्य असून भाजपचे राष्ट्रीय माध्यम सह-प्रभारी आणि प्रवक्ते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांसारख्या बड्या नेत्यांच्या ते जवळचे मानले जातात. संजय मयुख यांच्या व्यतिरिक्त ऋतुराज सिन्हा, रणवीर नंदन, अजय आलोक यांसारख्या कायस्थ नेत्यांच्या नावांचीही या जागेसाठी चर्चा होत आहे. भविष्यात पक्ष आपला उमेदवार म्हणून कोणाला नामनिर्देशित करेल हे पाहणे बाकी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.