For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीन नबीन यांना गोव्यातील नेत्यांचे समर्थन

01:06 PM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
नितीन नबीन यांना गोव्यातील नेत्यांचे समर्थन
Advertisement

अर्ज सादर करतेवेळी उपस्थिती दर्शवत दिला पाठिंबा : नबीन यांना शुभेच्छाही दिल्या

Advertisement

पणजी : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज काल सोमवारी भरला. यावेळी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत गोव्यातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. नबीन यांनी अर्ज सादर करताना गोव्यातील नेत्यांनी उपस्थिती लावत त्यांना समर्थन व शुभेच्छा दिल्या. नितीन नबीन यांनी भाजपच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, साबांखामंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर, माजी मंत्री बाबू कवळेकर, संजीव देसाई, आदींची उपस्थिती होती. आज मंगळवार 20 रोजी आवश्यक भासल्यास मतदान होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक सोहळ्यात गोव्यातील राजकीय नेते हजेरी लावणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.