For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन मांजरेकर यांची नियुक्ती

भाजप ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन मांजरेकर यांची नियुक्ती
Advertisement

वेंगुर्ले प्रतिनिधी : भाजपा ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीत वेंगुर्ले पंचायत समितीचे विद्यमान सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Advertisement

भाजप ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली. या निवडीचे अधिकृत पत्र भाजप जिल्हाद्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते ओरोस येथे नितीन मांजरेकर यांना देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची "ओ.बी.सी. मोर्चा" जिल्हा कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, त्यामध्ये नितीन मांजरेकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन मांजरेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. आडेली पंचायत समिती मतदार संघातून ते सदस्य म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान नितीन मांजरेकर यांच्या या नव्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष महेश पारकर यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नितीन मांजरेकर यांनी आपल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विश्वास दाखवून दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.