For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' चा नीती आयोगाकडून अभ्यास

05:12 PM Sep 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
 एआय सिंधुदुर्ग मॉडेल  चा नीती आयोगाकडून अभ्यास
Advertisement

भारतातील पहिले असे 'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' बनविण्याचा मान अभिमानास्पद - पालकमंत्री नितेश राणे

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligence) आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी दिलेले प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे मॉडेल प्रभावीपणे विकसित होऊ शकले. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही मोठी झेप ठरणार आहे. मार्व्हल यांनी विकसित केलेले हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले असून, लवकरच ते देशभरात स्वीकारले जाणार आहे. भारतातील पहिले असे 'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' बनविण्याचा मान आपल्या जिल्ह्याला मिळत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.