कसवण येथे उबाठा शिवसेनेला आ. नितेश राणेंचा धक्का
माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, युवा सेना उपतालुकाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील कसवण येथील उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत मेस्त्री, युवा सेना उपतालुकाप्रमुख व माजी ग्राम सदस्य उमेश गुरव, रुपेश गुरव, विजय गावकर, गणेश गुरव आणि संतोष मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.कसवण गावातील युवा सेनेचे पदाधिकारी भाजपामध्ये आल्याने उबाठाला मोठा धक्का बसला आहे. ओम गणेश या निवासस्थानी हा प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रशांत सावंत, यशोधन सर्पे, अभय गावकर, बंड्या मालंडकर, काना मालंडकर, भाई सावंत, गोट्या गुरव, संतोष ओरसकर, किशोर मेस्त्री, मंगेश गुरव, प्रमोद तेली, समीर गावकर, पप्पू तळेकर, संतोष सावंत,एकनाथ सावंत, निलेश सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.