पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; कणकवलीत जनतेशी साधणार संवाद
04:57 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कणकवली | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
Advertisement
दरम्यान, शनिवारी सायंकाळी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर पालकमंत्री नितेश राणे जनतेच्या गाठीभेटी घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान नागरिकांच्या विविध समस्या आणि स्थानिक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement