For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ससून डॉक येथील सामंजस्य करारानंतरच्या कार्यवाहीचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

08:57 PM Jul 27, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ससून डॉक येथील सामंजस्य करारानंतरच्या कार्यवाहीचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा
Advertisement

प्रतिनिधी, मुंबई : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबईच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मुंबईतील ससून डॉक येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच मरोळ मच्छीमार मार्पेटच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
ससून डॉक परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी करण्यात येणाऱ्या विविध सुविधा, पायाभूत विकासकामे आणि सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मरोळ मच्छीमार मार्पेटच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.मच्छीमार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हॅन्ड ग्लोव्हज आणि गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मच्छीमार समुदायाच्या दैनंदिन कामकाजात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक
प्रतिनिधी, मुंबई : रायगड जिह्यातील थळ नवगाव, (ता. अलिबाग) येथील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

बैठकीत मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित कामांचा समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

Advertisement

या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.