For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे नितेश राणेंचे प्रशासनाला निर्देश; उभादांडा हायस्कूल रस्त्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे नितेश राणेंचे प्रशासनाला निर्देश  उभादांडा हायस्कूल रस्त्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी
Advertisement

वेंगुर्ले : कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे उभादांडा हायस्कूल रस्त्याच्या प्रश्नावर न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

उभादांडा हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी उभादांडा हायस्कूलला भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या रस्त्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उभादांडा ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उभादांडा येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नितेश राणे यांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

Advertisement

यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रस्त्याच्या प्रश्नाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून रस्त्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

“कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी यावेळी मांडली.

Advertisement
Tags :

.