नीता अंबानी देशातील सर्वात शक्तीशाली महिला
फॉर्च्युन इंडियाच्या यादीत नीता अंबानी अव्वल स्थानी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी फॉर्च्युन इंडियाच्या ‘सर्वात शक्तिशाली टॉप 100 महिला’ यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा सन्मान त्यांना त्यांच्या नेतृत्व आणि समाजसेवेसाठी देण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, फाऊंडेशनने शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करून देशातील 10 कोटींहून अधिक लोकांचे जीवन बदलले आहे, ज्यात 2.9 कोटी मुलांचा समावेश आहे.
खरी शक्ती म्हणजे इतरांना सक्षम करणे: नीता अंबानी
या कार्यक्रमात नीता अंबानी म्हणाल्या, ‘नेतृत्व हे करुणा, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यावर आधारित असले पाहिजे. माझ्यासाठी खरी शक्ती म्हणजे इतरांना सक्षम करणे. भारताला करुणा, सहानुभूती आणि सर्व सजीवांबद्दल आदर यावर आधारित अधिक ‘सॉफ्ट पॉवर’ची गरज आहे.’ नीता अंबानी यांनी यावरही जोर दिला की मुलींना सक्षम केल्याने देश अधिक मजबूत होईल.
अमेरिकेत नुकताच ‘एएपीआय मानवतावादी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
फॉर्च्यून इंडियाच्या या क्रमवारीपूर्वी, नीता अंबानी यांना या महिन्यात 3 जुलै रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील टँपा शहरात एएपीआय मानवतावादी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी सन्मानित
आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि समाजविकास या क्षेत्रांतील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिनद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एआयमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व आवश्यक : स्मृती इराणी
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘सर्वांत शक्तिशाली महिलां’च्या यादीत 18 व्या क्रमांकावर होत्या. त्यांनी महिला-नेतृत्वाखालील उद्योगांना अधिक संस्थात्मक पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि म्हणाल्या, ‘भारताच्या विकासाचा पुढील टप्पा महिलांनी रोजगार निर्माण करण्यावर अवलंबून आहे.’
फॉर्च्यून इंडियाच्या यादीत असणाऱ्या भारतीय महिला
-नीता अंबानी
-रोशनी नाडर मल्होत्रा
-रे•ाr भगिनी -
-शोभना कामिनेनी,
-संगीता रे•ाr,
-प्रीथा रे•ाr
-सुनीता रे•ाr
-सावित्री जिंदाल,
-प्रीती अदानी,
-किरण मजूमदार-शॉ,
-ईशा अंबानी,
-प्रिया नायर,
-बेला बजरिया
-लीना नायर