निस्सानची मॅग्नाइट क्युरो कार भारतात लाँच
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
निस्सान कंपनीने भारतीय बाजारामध्ये आपली नवी कॉम्पॅक्ट एसयुव्ही मॅग्नाइट क्युरो एडिशन या नावाने कार नुकतीच सादर केली आहे. ऑल ब्लॅक थीम या थीमवर आधारित ही नवी कार अधिक स्टायलिश आणि प्रीमियम लूक घेऊन आली आहे. उत्कृष्ट लूक आणि खास वैशिष्ट्यो असणाऱ्या या गाडीच्या एक्स्टिरियरसाठी काळ्या रंगाची थीम ठेवण्यात आलेली आहे. कारमध्ये डॅशबोर्ड, गिअर शिफ्ट, स्टिअरिंग व्हिल, सन वाइझर आणि डोर ट्रिप्स सारख्या सुविधा असणार आहेत. यामुळे गाडीला स्पोर्टी लुक आला असून वैशिष्ट्यांचा विचार करता ड्युअल डिजिटल क्रीन, अर्कामीज साउंड सिस्टिम, इल्युमिनेटेड ग्लो बॉक्स, रियर एसी व्हेंट्स आणि ऑटो क्लायमेट कंट्रोलसारख्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.
सुरक्षितता, इंजिन
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहता कंपनीने आपल्या कारमध्ये सहा एअरबॅग्स दिल्या आहेत. इग्नाइट क्युरो एडिशन ही कार दोन इंजिन पर्यायासह उपलब्ध केली असून 1.0 लिटर नॅचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसमवेत असणार आहे. दोन्ही मॉडेलमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आला आहे.
किंमत, टक्कर
या गाडीची किंमत अंदाजे एक्स शोरूम 8.30 लाख रुपये इतकी असणार आहे. ग्राहकांना 11 हजार रुपये आगाऊ भरून गाडी बुक करता येणार आहे. या गाडीची स्पर्धा आता बाजारामध्ये टाटा नेक्सॉन, मारुती ब्रिझा, ह्युंडाई वेन्यू, किया सोनेट, रेनॉ कीगर आणि स्कोडा कुशाक यांच्याबरोबर होणार आहे.