निस्सान 11,676 युनिट्सच्या घाऊक विक्रीसह अव्वल
डिसेंबर ठरला सकारात्मक : मॅग्नेटसाठी बुकिंगचा आकडा 10 हजारवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निस्सान मोटर इंडियाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा टप्पा जाहीर केला आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, नवीन निस्सान मॅग्नेटसाठी बुकिंगचा आकडा 10 हजार युनिट्सवर पोहोचला आहे. तसेच, कंपनीने जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान एकूण 91,184 युनिट्सची विक्री केली. या कामगिरीसह कंपनीने आणखी एक विक्रम केला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये, कंपनीने एकूण 11,676 युनिट्सची घाऊक विक्री केली. कामगिरीच्या दृष्टीने कंपनीसाठी हा सर्वोत्तम डिसेंबर ठरला आहे. हे आकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निस्सान कारची जोरदार मागणी दर्शवतात. डिसेंबरमध्ये घाऊक विक्रीचा आकडा 9,558 युनिट्स आणि देशांतर्गत विक्रीचा आकडा 2,118 युनिट्स होता. डिसेंबर 2023 मधील 5,561 युनिट्सच्या तुलनेत निर्यातीचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे.
निर्यात 63 टक्के वाढली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीची निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 63 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीची ही भक्कम कामगिरी निस्सान कार्सबद्दल लोकांचा वाढता आत्मविश्वास आणि उत्साह याचे द्योतक आहे. ‘एक कार, एक जग’च्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, भारतात बनवलेल्या नवीन निस्सान मॅग्नाइटने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निस्सानच्या विस्ताराला गती दिली आहे. कंपनीची एकूण निर्यात 65 पेक्षा जास्त देशांना होत असून 45 हून अधिक नवीन बाजारपेठांमध्ये निर्यातीची संधी कंपनीने शोधलेली आहे.
काय म्हणाले एमडी
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, ‘2024 हे वर्ष भारतातील निस्सानसाठी मोठ्या बदलांचे आहे. यावर्षी आम्ही व्यापक बदल पाहिले आणि 4थ्या पिढीतील निस्सान एक्स ट्रायल आणि नवीन निस्सान मॅग्नेट सारखी नवीन मॉडेल सादर केली. कंपनीचे डिसेंबरमध्ये होणारे ऐतिहासिक प्रदर्शन हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या आमच्या कारवरील विश्वासाचे प्रतीक आहे. नाशिक आणि गोरखपूर सारख्या शहरांमध्ये नेटवर्क विस्ताराच्या दिशेने आमची अलीकडील पावले आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस टचपॉइंट्सची संख्या 300 पर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट असणार आहे.