निसान मोटरची नवी टेक्टॉन येणार
कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ आणि डिजिटल क्लस्टर मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निसान मोटर इंडिया कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, या कारचे नाव ‘टेक्टन’ राहणार असून ती ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी व्हिक्टोरिस, ग्रँड विटारा, किआ सेल्टोस आणि फोक्सवॅगन टिगुआन या सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. कंपनीने नवीन एसयूव्हीचा फर्स्ट लूक जाहीर केला आहे. त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल क्लस्टर आणि सुरक्षेसाठी 360 डिग्री कॅमेरा असलेले लेव्हल-2 एडीएएस सारख्या सेफ्टी फीच असतील. ते भारतात तयार केले जाईल आणि येथून आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जाईल.
निसान टेक्टॉनची एक्स-शोरूम किंमत 10.5 लाख रुपये (पॅन-इंडिया) आहे. ती 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत सादर केली जाईल. निसानच्या भारतीय लाइनअपमध्ये एक्स-ट्रेल एसयूव्ही देखील समाविष्ट आहे, जी येथे आयात आणि विक्री केली जात आहे.