निस्सानची नवी कॉम्पॅक्ट‘ग्रॅव्हिटी’ लाँच
सुरुवातीची किंमत 5.65 लाख रुपये : 19.6 किमी प्रति लिटर मायलेज
नवी दिल्ली :
निस्सान इंडियाने भारतीय बाजारात त्यांची नवीन कॉम्पॅक्ट एमपीव्ही ‘ग्रॅव्हिटी’ ही कार लाँच केली आहे. कंपनीने त्याची किंमत 5.65 लाख (एक्स-शोरूम) रुपये ठेवली आहे. ही किंमत पहिल्या 5 हजार ग्राहकांसाठी लागू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्रॅव्हिटी रेनॉल्ट ट्रायबर प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे.
5 हजार ग्राहकांना 5 वर्षांसाठी मोफत सेवा
ग्रॅव्हिटीवर 3 वर्षे किंवा 1 लाख किमीची मानक वॉरंटी उपलब्ध असेल. परंतु ग्राहक त्यांच्या गरजेनुसार ती 10 वर्षे किंवा 2 लाख किलोमीटरपर्यंत वाढवू शकतात. पहिल्या 5 हजार ग्राहकांना पहिल्या 5 वर्षांसाठी ‘झिरो सर्व्हिस कॉस्ट’चा लाभ मिळेल. यासोबतच, कार अपग्रेडसारखे इतर फायदे देखील या ग्राहकांना दिले जाणार आहेत.
इंजिन आणि मायलेज:
19.3 किमी प्रति लिटर इतके मायलेज सदरची नवी गाडी देणार असल्याचे निस्सानने म्हटले असून त्यांच्या नवीन कार ग्रॅव्हिटीमध्ये 1.0 लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. ते 72 एचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीने संकेत दिले आहेत की, डीलर स्तरावर लवकरच ते ‘ड्युअल-सिलेंडर सीएनजी किट’ने सुसज्ज असेल.
वैशिष्ट्यो: सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज आणि क्रूझ कंट्रोल निस्सानने त्याला वैशिष्ट्यांची मोडी जोड दिली आहे. टॉप मॉडेल्समध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी वैशिष्ट्यो मिळतात. सुरक्षिततेसाठी, त्यात 6 एअरबॅग्ज आणि मागील पार्किंग सेन्सर आहेत.