महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘निस्सान’ नव्या फिचर्ससोबत दाखल

07:00 AM Jul 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निस्सान मॅग्नाइट रेडची किमत 7.86 लाखपासून सुरु

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

निस्सानने 2020 नंतर पुन्हा मॅग्नाइटचे रेड कलरमधील मॉडेल बाजारात दाखल केले आहे. जुन्या मॅग्नाइट एक्सव्ही ट्रिम मॉडेलच्या तुलनेत सदरचे मॉडेल काही मॉडर्न फिचर्ससोबत केले आहे. निस्सानच्या मॅग्नाइट रेडची सुरुवातीची किमत ही 7 लाख 86 हजार रुपये इतकी एक्स-शोरुम किमत राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

नवीन मॉडेलमधील बदल

नवीन मॅग्नाइट रेड मॉडेलमध्ये गाडीचा काही भाग रेड कलरमध्ये डिझाईन केला आहे. रेड कलर डिझाईनची रचना कारच्या प्रंट ग्रिल, समोरील बंपरच्या खालचा भाग व्हीलमध्ये आणि साइडच्या दारांमध्ये करण्यात आली आहे. यासह 8 इंच एलइडी टच स्क्रीनही देण्यात आली आहे.

ग्राहकांच्या पसंतीचे मॉडेल : श्रीवास्तव

निस्सानचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी म्हटले, की सध्याचे मॉडेल हे ग्राहकांना खूप पसंतीस पडले असून आतापर्यंत 1 लाखपेक्षा अधिकचे बुकिंग या गाडीकरीता प्राप्त झाले आहे. यामुळे आगामी काळातही या गाडीची पसंती वाढणार असल्याचा वेश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.

अन्य बाबी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article