आयआयएस दंगल चॅम्पियनशिपमध्ये निशू, यश यांची चमक
वृत्तसंस्था / हिसार
2026 आयआयएस दंगल चॅम्पियनशिपचा समारोप 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद विजेत्या निशू आणि यश यांनी त्यांच्या संबंधित वजन गटात अव्वल स्थान पटकावत झाला. इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट (आयआयएस) द्वारे आयोजित या चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी उपस्थिती दिसून आली. 300 हून अधिक प्रवेशिका आणि सुमारे 240 स्पर्धकांनी शहीद मदन लाला धिंग्रा मल्टिपर्पजल हॉल, गिरी सेंटर, सीसीएस एचएयू, हिसार येथे नऊ श्रेणींमध्ये भाग घेतला.
सर्बियातील नोवी सॅड येथे नुकतेच अंडर 23 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी 53 किलो वजनी कुस्तीगीर निशू उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती आणि तिने सुवर्णपदकापर्यंत पोहोचताना तिच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी खूपच मजबुत असल्याचे सिद्ध केले. दिल्ली राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या यशने (74 किलो फ्रिस्टाईल) देखील प्रभावी कामगिरी करत त्याच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकाविले. दोन्ही कुस्तीगीरांना आकर्षक बक्षीस रकमेचे चेक देवून गौरविण्यात आले. निशूला 31000 रुपये आणि यशला 51000 रुपये मिळाले.
2025 मध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे उत्साहित होवून, या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीने देशभरातील सहभागींसाठी आपले दरवाजे उघडले. जवळजवळ 20 टक्के प्रवेशिका हरियाणाबाहेरुन आल्या होत्या. ज्यामुळे चॅम्पियनशिपची वाढती पोहोच दिसून येते. पुरूषांच्या गटात सुमारे 250 प्रवेशिका नोंदल्या गेल्या तर महिलांच्या गटात 50 हून अधिक प्रवेशिका नोंदल्या गेल्या.
या स्पर्धेत आयआयएस स्टेबलमधील अनेक उल्लेखनीय नावे देखील होती. ज्यात काजल 62 वरील किलो), निशू (53 किलो), सुरज (60 किलो ग्रीको रोमन, 17 वर्षांखालील जागतिक सुवर्णपदक विजेता), सुमित 60 किलो ग्रीकोरोमन, 20 वर्षांखालील जागतिक कांस्यपदक विजेता) आणि सुमित मलिक (57 किलो फ्रीस्टाईल, 20 वर्षांखालील जागतिक कांस्यपदक विजेता) यांचा समावेश होता.
ही स्पर्धा एकाच दिवसांत आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही जास्तीतजास्त सहभाग मिळावा यासाठी एकाच वेळी तीन मॅट्स खेळवण्यात आल्या होत्या. दिवसभर सतत खेळाचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण होते. आयआयएस महिला प्रशिक्षक कोसेई अकायशी आणि उच्च कार्यक्षमता संचालक गॅरी हॉल उदयोन्मुख प्रतिभेचा शोध घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. आयआयएस दंगल स्पर्धा, अशा इतर उपक्रमांसह वरिष्ट स्तरीय स्पर्धा आणि उच्च कार्यक्षमता स्पर्धात्मक वातावरणात त्यांचे संगोपन करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.
पूर्ण निकाल आयआयएस दंगल चॅम्पियनशिप 2026
वरिष्ठ गट फ्रीस्टाईल
57 किलो गट: सतदेंर सुवर्ण, रोहीत रौप्य, साहिल विजेंदर व साहील देवेंद्र कांस्य, 74 किलो- यश सुवर्ण, अंकित जसमेर रौप्य, साहील सुरेश, मंगल कांस्य, 125 किग्रॅ- रोहीत सुवर्ण, दीपक रौप्य, अर्जुन, सचिन कांस्य, ग्रीको रोमन 60 किलो- सुरज सुवर्ण, कुलदीप रौप्य, रुपिन, हिमांशू कांस्य, 77 किलो-विकास सुवर्ण, सचिनकुमार रौप्य, सुरजमल, धीरज कांस्य, 130 किलो- विपिन सुवर्ण, निशांत रौप्य, जोगिंदर, परदीप कांस्य, महिला कुस्तीपटूंमध्ये 53 किलो गटात निशू सुवर्ण, स्वाती रौप्य, सारिका, नॅन्सी कांस्य, 62 किलो गटात- अंजली सुवर्ण, काजल रौप्य, तन्नू, साक्षी कांस्य, 76 किलो- चंचल सुवर्ण, प्रियांका रौप्य, मंजू व मानसी यांनी कांस्यपदक पटकाविले.