महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निश्चल चंदन जमशेदपूर एफसाशी करारबद्ध

06:22 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जमशेदपूर एफसीने युवा डिफेंडर निश्चल चंदन नव्या आयएसएल मोसमासाठी करारबद्ध केले असून कामगिरी चांगली झाल्यास या करारात वाढ करण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे.

Advertisement

सहा फूट उंची लाभलेल्या या 25 वर्षीय युवा सेंट्रल डिफेन्समध्ये प्रतीक चौधरीसमवेत खेळणार आहे. ‘जमशेदपूर निएफसी संघात सामील होणे हे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. या संघाला मोठा इतिहास असून त्याच्याशी निगडित झाल्याने मी उत्साहित झालो आहे. प्रमुख प्रशिक्षक खालिद जमिल व संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखविला याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन,’ अशा भावना निश्चलने व्यक्त केल्या.

मिनर्व्हा अकादमी पंजाबमधून त्याच्या कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात झाली. तेथे कौशल्य आत्मसात केल्यानंतर या संघातून यू-18 उत्तर विभागीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. नंतर त्याला द्वितीय विभागीय आय-लीगमध्ये बढती मिळाली. 2021-22 मध्ये त्याने पंजाब एफसीचे प्रतिनिधित्व केले तर 2021-23 मध्ये त्याला सुदेवा एफसीकडून खेळायला मिळाले. यावेळी त्याने आय-लीगमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना गोलही नोंदवला. त्याची प्रभावी कामगिरी पाहून गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने 2023-24 या मोसमासाठी त्याला करारबद्ध केले, त्यात त्याने 19 गोल नोंदवले. आता तो जमशेदपूर एफसी संघाशी जोडला गेला आहे.

‘निश्चलला एक सुंदर संधी मिळाली आहे. पण त्याने संयम बाळगून संधी मिळाण्याची प्रतीक्षा करायला हवी. संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याला आपले कौशल्य दाखवावे लागेल आणि सातत्याने शानदार प्रदर्शन करावे लागेल,’ असे मुख्य प्रशिक्षक खालिद जमिल म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article