स्वच्छ ग्राम स्पर्धेत निरवडे ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम
न्हावेली / वार्ताहर
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत निरवडे ग्रामपंचायत सन २०२१-२२ मध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त निरवडे ग्रामपंचायतीला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली १२ ॲागस्टला पनवेल येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.हे यश केवळ एकट्याचे नसून गावातील ग्रामस्थ माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नाची मोठी ताकद आहे.निरवडे गावासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन सरपंच सौ.सुहानी गावडे यांनी केले.निरवडे ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध अभियानात यश मिळविले आहे.निर्मल ग्राम पुरस्कार स्मार्ट पुरस्कार असे विविध पुरस्कार निरवडे गावाने स्वच्छतेमध्ये सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८ पासून २०२३ अंतर्गत स्पर्धेमध्ये निवड झालेल्या ग्रामपंचायतींचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे आद्यक्रांती वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमास प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता बक्षीस पत्र ग्रामपंचातचे विद्यमान व तत्कालीन सरपंच गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण विभागाच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.