For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडे ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम

04:27 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम
Advertisement

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत निकाल

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२१-२२ अतंर्गत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या अभियानांतर्गत मिळालेल्या पुरस्काराचे वितरण २५ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील सिडको भवन येथे आयोजित समारंभात करणायात आले.१० लाख रुपये रोख ,प्रशस्तीपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.हा सन्मान कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे निरवडेचे माजी सरपंच हरि वारंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,निरवडे ग्रामपंचायत लिपिक संजय शेटकर,ग्रामपंचायत शिपाई भरत माणगावकर,आदी उपस्थित होते.निरवडे गावाला मिळालेल्या या यशामुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी बचत गट प्रमुख , उपमुख्य कार्यकारी ठाकूर ,स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे निरवडे गावाला हे यश मिळाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.