For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री.वारणा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निपूणराव कोरे, व्हा. चेअरमनपदी उत्तम पाटील

06:54 PM Nov 06, 2023 IST | Abhijeet Khandekar
श्री वारणा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निपूणराव कोरे  व्हा  चेअरमनपदी उत्तम पाटील
Nipunrao Kore Chairman Varana Co-operative Bank
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री वारणा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निपूणराव विलासराव कोरे तर व्हा.चेअरमनपदी उत्तम बाबासो पाटील यांची अविरोध निवड झाली. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यमान चेअरमन निपूणराव कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची सलग चौथ्यांदा निवडणूक बिनविरोध झाली आहे.आज सोमवार दि.६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष सभेत चेअरमन व व्हा. चेअरमन निवड प्रक्रीया पार पडली.

Advertisement

या निवडीनंतर नूतन चेअरमन निपूण कोरे म्हणाले आजवर सर्वच सभासदांनी बँक व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे सलग चौथ्यांदा निवडणूक बिनविरोध पार पडली त्याबद्दल सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानून संचालक मंडळाच्या माध्यमातून बँक अधिकाधिक प्रगती पथावर नेण्यासाठी आपला प्रयत्न राहिल असे सत्कार प्रसंगी सांगितले.

नूतन चेअरमन निपूण कोरे, व्हा.चेअरमन उत्तम पाटील यांचा निवडणूक अधिकारी नारायण परजणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे अधिकारी,कर्मचारी, कार्यकर्ते यांनी सत्कार केले.निवडणूक अधिकारी नारायण परजणे यांचा देखील निवडणूक प्रक्रीया यशस्वी पूर्ण केलेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, नूतन संचालक मंडळ, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ,अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.