For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निपाणी एफसी, ब्रदर्स संघ अंतिम फेरीत

10:00 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
निपाणी एफसी  ब्रदर्स संघ अंतिम फेरीत
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात निपाणी एफसीने इलेव्हन स्टार एफसीचा सडन डेथमध्ये तर ब्रदर्सने युनायटेड गोवन्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात निपाणी एफसीने इलेव्हन स्टार संघाचा सडन डेथमध्ये पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 18 व्या मिनिटाला विकी गौतमच्या पासवर राहीदने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात निपाणी स्पोर्ट्स क्लबच्या 31 व्या मिनिटाला ज्ञानेश्वरच्या पासवर करण मानेने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. शेवटी पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्येही दोन्ही संघांनी 5-5 अशी बरोबरी केली. निपाणीतर्फे करण, ऋषिकेश, ओमकार, प्रशांत, ज्ञानेश्वर यांनी गोल केले.

Advertisement

तर इलेव्हन स्टारतर्फे तेजस, ओवेज, विकी गौतम, मोहमद अनास, रशीद यांनी गोल केले. त्यानंतर पंचांनी सडनडेथ नियमाचा वापर केला.  निपाणी ने 7-6 अशा फरकाने सामना जिंकला. निपाणीतर्फे जीत, सचिनने गोल केला तर इलेव्हन स्टारच्या ताहिदने चेंडू बाहेर मारला. दुसऱ्या ओपन फ्रीच्या सामन्यात ब्रदर संघाने युनायटेड गोवन्सचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 22 व 26 व्या मिनिटाला गोवन्सच्या जयेशच्या पासवर इकलास अहमदने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. या सत्रात युनायटेड गोवन्सच्या खेळाडूंनी संधी वाया घालवल्यामुळे त्यांना गोल करण्यास अपयश आले. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला जयश्रीने तिसरा गोल करून 3-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात युनायटेड गोवन्स संघाला गोल करण्यात अपयश आले. शनिवारी स्पर्धेला सुट्टी असून रविवारी अंतिम सामना निपाणी एफसीविरुद्ध ब्रदर्स एफसी यांच्यात सायंकाळी 4 वाजता खेळविण्यात येणार आहे. बक्षीस वितरण प्रसंगी लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे सर्व डायरेक्टर्स व बीडीएफएचे सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.