For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवव्या संशयिताला अटक

06:21 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवव्या संशयिताला अटक
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

हडफडे येथील येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात आणखीन एका संशयिताला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.  या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या नवव्या संशयिताचे नाव बिजय कुमार सिंग (38) असून  तो झारखंडचा रहिवासी आहे. तो नाईट क्लबचा  कार्यकारी व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आग लागण्याची दु:खद घटना 6 डिसेंबर 2025 रोजी घडली होती. त्यावेळी 150 हून अधिक पर्यटक नाईट क्लबमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वापरल्या गेलेल्या आतषबाजीत लाकडी छताला स्पर्श होऊन इमारतीला आग लागली होती, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.  या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.