कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गर्दीत कार घुसवून नऊ जणांची हत्या

06:53 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅनडातील व्हँकूवरमधील घटना : 30 वर्षीय आशियाई तरुण ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

Advertisement

कॅनडातील व्हँकूवरमध्ये एका तरुणाने गर्दीत कार घुसवत अनेक लोकांना चिरडले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 8:00 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 वाजता) फिलिपिनो समुदायाच्या ‘लापू-लापू’ या उत्सवादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून तो आशियाई वंशाचा असल्याचे व्हँकूवर पोलिसांनी सांगितले. सदर तरुणाची अधिक चौकशी केली जात आहे.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या प्रियजनांना, फिलिपिनो-कॅनेडियन समुदायाला आणि व्हँकूवरच्या सर्व लोकांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तसेच आजच्या ‘लापू-लापू’ दिनाच्या कार्यक्रमात घडलेल्या भयानक घटनेने मला धक्का बसला आहे, असे व्हँकूवरचे महापौर केन सिम म्हणाले. या अत्यंत कठीण काळात आमच्या संवेदना व्हँकूवरमधील सर्व प्रभावित लोकांसोबत आणि फिलिपिनो समुदायासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Next Article