For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादमध्ये आगीत नऊ जणांचा मृत्यू

06:52 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादमध्ये आगीत नऊ जणांचा मृत्यू
Advertisement

कार दुरूस्तीवेळी आगीची ठिणगी पडून केमिकल गोदामासह इमारतीला आग

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

हैदराबादमधील केमिकल गोदामाला लागलेल्या भीषण आगीत सोमवारी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबादच्या नामपल्ली येथे ही घटना घडली. येथील चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत इमारतीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यास हातभार लावला. सुरक्षितपणे वाचविण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

Advertisement

 

हैदराबादच्या सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर गॅरेजमध्ये कारच्या दुऊस्तीचे काम सुरू होते. याचदरम्यान गोदामात ठेवलेल्या केमिकल बॅरलपर्यंत आगीची ठिणगी पोहोचल्याने भडका उडाला. काही वेळातच आगीने इमारतीच्या इतर मजल्यांना वेढल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत बांधलेल्या गोदामात तेलाचे अनेक बॅरल ठेवण्यात आल्याचेही तपासादरम्यान समोर आले आहे. रसायनाच्या साठ्यामुळे आगीने भीषण रूप धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.

आगीची दुर्घटना कार दुऊस्तीदरम्यान घडली आहे. एका गॅरेजमध्ये कार दुरूस्तीचे काम सुरू असताना शेजारी ठेवलेल्या रसायनाच्या साठ्याला आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की आग आटोक्मयात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. याशिवाय जवळच्या इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत होते. 9 जणांच्या मृत्यूशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्याचे काम तातडीने हाती घेतले. तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य निभावले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बहुमजली इमारतीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या मुलाला वाचवतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देवदूताच्या रूपात या मुलाला इमारतीबाहेर कसे सुखरूप बाहेर काढले ते दिसत आहे.

केमिकलची बेकायदेशीर साठवणूक

अग्निशमन सेवा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नागी रेड्डी यांनी या इमारतीत बेकायदेशीररीत्या रसायनांचा साठा केला असण्याची शक्मयता व्यक्त केली. इमारतीच्या स्टिल्ट एरियात (पार्किंग) रसायने साठवली गेली होती. या रसायनांमुळे आग लागली. एकूण 21 जणांना वाचवण्यात यश आले, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जणांवर उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री के. टी. रामाराव यांची घटनास्थळी धाव

दरम्यान, तेलंगणा सरकारमधील मंत्री के. टी. रामाराव यांनी हैदराबादमधील नामपल्ली येथील अपार्टमेंट कॉम्प्लेक्स गोदाम घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेतली. या घटनेचा योग्य तपास करण्यात येणार असून रसायनांचा साठा बेकायदेशीरपणे साठवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.