महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात तीन दिवसात नऊ हत्तींचा मृत्यू

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील घटनेने खळबळ : तपासासाठी केंद्रीय पथक दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/उमरिया

Advertisement

मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक हत्तींचा मृत्यू होत आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यानात गुऊवारी दुपारी आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसात येथील 9 हत्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका जम्बो हत्तीची प्रकृती गंभीर असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्तींचा मृत्यू होण्याची घटना प्रथमच घडत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसटीएफ’ची टीम दाखल झाली आहे. तसेच केंद्रीय पातळीवरूनही एक विशेष पथक पाठविण्यात आले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या संपूर्ण मध्यप्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या हत्तींच्या मृत्यूचीच चर्चा सुरू आहे.

9 हत्तींच्या मृत्यूंनंतर हत्तीला वाचवण्यासाठी डॉक्टरांची टीम अजूनही कार्यरत आहे. याप्रकरणी ‘एसटीएफ’ म्हणजेच विशेष कृती दलाने श्वानपथकाच्या मदतीने 7 शेतवड्या आणि 7 घरांची झडती घेतली आहे. तसेच 5 जणांची चौकशी केली. घटनास्थळापासून पाच किमीच्या परिघात तपास करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, सालखानिया गावात 13 हत्तींचा कळप एका शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला होता. त्या शेतात नाचणीचे पीक घेतले होते. काही पिकांची कापणी झाली होती तर काही धान्य सुकवण्यासाठी ठेवले होते. काही भागात नाचणीची कणसे हिरवीगार दिसत होती. हेच पीक हत्तींनी खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी एकामागून एक 4 हत्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसात हा आकडा आता 9 वर पोहोचला आहे.

एसआयटी तपास करणार

बुधवारपर्यंत सर्व 7 हत्तींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर पुरण्यात आले आहेत. त्यासाठी 300 पोती मीठ आणि ख•ा खोदण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आली होती. मध्य प्रदेशचे वनमंत्री रामनिवास रावत यांनी हत्तींच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाला (एसआयटी) तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article