रेड अलर्ट असतानाही धो धो पावसात रक्तदात्यांनी गाठले बांबोळी
सांगेली येथील महिलेसाठी नऊ रक्तदात्यांचे रक्तदान
ओटवणे। प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या सांगेली येथील समिधा संदीप सांगेलकर (सांगेली) यांना मंगळवारी तात्काळ ९ बी पॉझिटिव्ह ब्लड बॅगची आवश्यकता असताना सांगेली येथील युवा विकास प्रतिष्ठान आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या ९ नियमित रक्तदात्यांनी मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने रेड अलर्ट जाहिर केला असतानाही धोधो पावसात त्वरीत बांबुळी गाठत तात्काळ रक्तदान केले. त्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी या सर्व रक्तदात्यांसह युवा विकास प्रतिष्ठान व ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आभार मानले.या महिलेसाठी नितीन राऊळ, अभिजीत कविटकर, सत्यवान मेस्त्री, अमित मेस्त्री, सौ. उमा वराडकर, बबन कोचरेकर, यश कदम, मंगेश माणगावकर, पियुष सांगेलकर या सर्व रक्तदात्यांनी रक्तदान केले तर निलेश नाईक, सुहास राऊळ, सुशांत राऊळ, नरेश राऊळ या रक्तदात्यांना राखीव ठेवण्यात आले. दरम्यान गोवा स्थित केरळ येथील एल्डोस साजू हे सुद्धा प्लेटलेट (SDP) देण्यासाठी पोचले होते. परंतु प्लेटलेट स्टॉकमध्ये असल्याने त्यांना सुद्धा रिझर्व ठेवण्यात आले आहे. ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते नेहमीच रक्तदानासाठी तत्पर असतात आणि रुग्णांचा जीव वाचवतात. त्यामुळे अशा रक्तदात्यांच्या तत्परतेवरच या संस्थेचे रक्तदानाचे कार्य निरंतर सुरु आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रक्तदान करणाऱ्या संस्थेच्या सर्वच रक्तदात्यांचा संस्थेला सार्थ अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.