For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाची-सुळगा (हिं.) गावासाठी नऊ एकर जागा मंजूर

09:50 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाची सुळगा  हिं   गावासाठी नऊ एकर जागा मंजूर
Advertisement

जमीन हस्तांतर करण्याचे आदेश : क्रीडांगण अन् तलाव निर्मितीस मान्यता : माजी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकरांच्या प्रयत्नाना यश

Advertisement

वार्ताहर/उचगाव

सुळगा (हिं.) व बाची या गावासाठी येथील नागरिकांनी अनेक दिवसापासून क्रीडांगण आणि तलावाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आमदार व माजी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने शासकीय जमीन मंजुरीच्या या कार्याला यश आले आहे. सदर जमीन लवकरच हस्तांतरित करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी दिली आहे.

Advertisement

बाची शाळेसाठी तीन एकर जागा

बाची गावातील प्राथमिक मराठी शाळेला क्रीडांगण नसल्याने विद्यार्थ्यांची खेळाची कुचंबना होत असे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेला क्रीडांगणसाठी जागा उपलब्ध करून मिळावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांमधून करण्यात येत होती. त्यानुसार शासनाकडे याचा पाठपुरावा करून महसूल विभागाच्या मालकीची तीन एकर जमीन शाळेच्या क्रीडांगणासाठी शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केला आहे. या जागेमुळे विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यास मदत होणार आहे. क्रिडांगणाची जागा मंजूर झाल्याने बाची गावातील पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सुळगा (हिं.) येथे क्रीडांगण, सार्वजनिक तलावाला मंजुरी

सुळगा हिं येथे प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन शाळा असून, या शाळेतील विद्यार्थ्यांचा सराव क्रीडागणांअभावी म्हणावा तसा होत नव्हता. ाासाठीच गावातील पालक वर्गाने क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून मिळावी अशी मागणी केली होती. तसेच पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी तलाव निर्मितीही महत्त्वाची होती. ही गरज लक्षात घेऊन लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी या गावाला तलावाचीही निर्मिती करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement
Tags :

.