For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जॉब ट्रॅफिकिंग’मध्ये निमरत कौर

06:26 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘जॉब ट्रॅफिकिंग’मध्ये निमरत कौर
Advertisement

ऑनलाइन स्कॅमच्या जाळ्यात अनेक लोक अडकत असतात, परंतु अनेक स्कॅमर्स स्वत:च पीडित असतात हे तुम्हाला माहिती आहे का? या पार्श्वभूमीवर आगामी वेबसीरिज ‘जॉब ट्रॅफिकिंग’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

जॉब ट्रॅफिकिंग सीरिजचा टीझर जारीकरत याची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन प्रशांत नायर करत आहेत. सेलेक्ट मीडिया हॉल्डिंग्ज आणि चॉकबोर्ड एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित या सीरिजमध्ये निमरत कौर, रोशन मॅथ्यू, काव्या त्रेहान आणि पवन मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. विदेशात नोकरी मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची फसवणूक होत असते. जी गोष्ट एका संधीदाखल सुरु होते, ती लवकरच जिवंत राहण्याची लढाई ठरते असे याच्या टीझरच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. 8 एपिसोड्सची ही थ्रिलर सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना ऑनलाइन स्कॅमच्या अंधारयुकत जगात नेणार आहे. सीरिजची कहाणी स्कॅमच्या मागे दडलेल्या पूर्ण नेटवर्कला समोर आणते. सीरिज तीन अनोळखी लोकांच्या अवतीभवती घुटमळणारी आहे, ज्यात एक स्कॅमर असून तो या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, एक फसवणुकीची शिकार ठरलेली गृहिणी असून ती उत्तरांचा शोध घेत आहे, तर एक सीईओ या पूर्ण खेळादरम्यान अडकून पडलेला असतो.

Advertisement
Advertisement
Tags :

.