महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निमिषाच्या आईला येमेनला जाण्याची अनुमती

06:22 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्लडमनीद्वारे मुलीला वाचविण्याचा करणार प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हत्येच्या आरोपात येमेनच्या तुरुंगात कैद निमिषा प्रियाच्या आईला दिल्ली उच्च न्यायालयाने येमेनला जाण्याची अनुमती दिली आहे.  निमिषाची आई येमेनमध्ये जाऊन ब्लड मीन सेटलमेंट करणार आहे. मुलीचा जीव वाचविण्यासाठी मारले गेलेल्या इसमाच्या परिवाराला भरपाई देत तडजोड करण्याचा आणि निमिषाची शिक्षा माफ करविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे.

मारले (हत्येद्वारे) गेलेल्या इसमाचा परिवार दोषीच्या परिवाराकडून पैसे स्वीकारून माफी देऊ शकतो असा कायदा अनेक इस्लामिक देशांमध्ये आहे. यालाच ब्लड मनी म्हटले जाते. दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाल्यास याची माहिती स्थानिक न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागते. यानंतर न्यायालया दोषीची शिक्षा माफ करत त्याच्या सुटकेचा आदेश देते.

7 वर्षांपासून तुरुंगात

भारतीय नर्स निमिषा प्रिया 7 वर्षांपासून येमेनच्या तुरुंगात कैद आहे. निमिषा ही मूळची केरळची रहिवासी आहे. निमिषाने येमेनमध्ये स्वत:च्या बिझनेस पार्टनरची हत्या केली होती. 2017 मध्ये तलाल अब्दो मेहदी नावाच्या व्यक्तीला कथित स्वरुपात गुंगीचे इंजेक्शन टोचून ठार केल्याप्रकरणी तिला दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने तिला मृत्युदंड ठोठावला होता. याचमुळे निमिषाची आई येमेनला जात तिला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.

येमेनला जाणे धोकादायक

निमिषाच्या आईने नोव्हेंबर महिन्यात येमेनला जाण्याच्या अनुमतीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. यानंतर न्यायालयाने विदेश मंत्रालयाला या मागणीवर विचार करण्याचा निर्देश दिला होता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येमेनचा प्रवास सुरक्षित नसल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले होते. येमेनमधील गृहयुद्धामुळे भारतीय दूतावास जिबूती येथे स्थानांतरित करण्यात आला आहे. तसेच राजधानी सनामधील नव्या व्यवस्थेसोबत भारताचे कुठलेच औपचारिक संबंध नाहीत. सुरक्षा विचारात घेत येमेनला जाण्याची अनुमती दिली जाऊ शकत नसल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article