कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आ. निलेश राणेंच्या हस्ते काळेथर देवली खारभूमी नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

05:49 PM Feb 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण | प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीज वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा विकासनिधी कोकणाला दिला. आमदार नसतानाही मागणी केलीली सर्व कामे प्राधान्याने मंजूर केली. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून कोकणाला अधिकाधिक विकासनिधी प्राप्त होत आहे. मागील दहा वर्षात मालवण कुडाळच्या जनतेने भोगले आहे. मात्र आता जनतेला अपेक्षित असलेला विकास शाश्वत स्वरूपात करताना विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी काळेथर देवली येथे बोलताना व्यक्त केले.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून
खारभूमी विकास विभाग सिंधुदुर्गनगरी अंतर्गत खारभूमी विकास उपविभाग कणकवली अधीपत्याखाली मालवण तालुक्यातील काळेथर देवली खारभूमी योजनेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 3 किलोमीटर लांब यां बंधाऱ्यासाठी 6 कोटी 75 लाख मंजूर निधीतून हे काम होत आहे. खाऱ्या पाण्यापासून होणारी आपत्ती कमी होणार असून शेकडो एकर क्षेत्र बाधित होण्यापासून संरक्षित होणार आहे.

Advertisement

या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, देवली गावचे सरपंच शामसुंदर वाक्कर, उपसरपंच हेमंत चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, बुथ अध्यक्ष रामचंद्र चव्हाण, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर, कार्यकारी अभियंता भाग्यश्री पाटील, उपविभागीय अधिकारी कणकवली उपाविभाग अनिल जाधव, सहाय्यक अभियंता श्रेणी २ स्वप्नील होडावडेकर, ज्युनियर इंजिनियर शुभम दाभाडे, ठेकेदार सावंत देसाई, माजी नगरसेवक दीपक पाटकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, देवली ग्राप सदस्य मेघा पाटकर, मनीष पाटकर, अमित वाक्कर, ग्रापसदस्य रुपल आचरेकर, गंगाराम आचरेकर, तारकर्ली ग्राप सदस्य प्रेरणा सावंत, जयवंत सावंत, वैभव सावंत, माधुरी कुबल, मोहन केळुस्कर, गजानन कुबल, दशरथ केळुस्कर, सौ. केळुस्कर, अजय पारकर, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, मंदार लुडबे, राजू बिडये, विक्रांत नाईक, निषय पालेकर यांसह देवली काळेथर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आपत्ती सौम्यकरण अंतर्गत आमदार निलेश राणे साहेब यांच्या मंत्रालय स्तरावरील पाठपुराव्यातून हे काम मंजूर झाले. 15 वा वित्तआयोग अंतर्गत केंद्र व राज्य सरकार माध्यमातून खाऱ्या पाण्यामुळे होणारी आपत्ती कमी करून बाधित होणारे क्षेत्र संरक्षित होणार आहे. 1995 साली हा बंधारा झाला होता. आता 30 वर्षांनी त्याचे नूतनीकरण आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून होत आहे. खा. नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे विशेष सहकार्य यात लाभले. असेही पाटील म्हणाल्या. तर कोकण विभागात 19 कामे होत असून सुमारे दोन हजार पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होण्यपासून संरक्षित होणार आहे. त्यापैकी होत असलेले हे मोठे काम असल्याचे पाटील म्हणाल्या.

महायुती सरकारचा आभारी

यावेळी आ. निलेश राणे म्हणाले, मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महायुती सरकारचा आभारी आहे. सोबतच यां कामात पालकमंत्री नितेश राणे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. मागील काळात आमदार असताना त्यांना सांगितल्या नंतर त्यांनी हे काम यादीवर घेतले. आता काम होत असताना जे क्षेत्र अजूनही बाधित होऊ शकते त्याच्या संरक्षणा साठीही उपाययोजना खारभूमी विभागाने करावी. तसेच ठेकेदाराने दर्जेदार काम वेळेत पुर्ण करावे. अश्या सक्त सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या.

फोटो : काळेथर देवली खारभूमी योजनेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article