श्री देव नारायण, रामेश्वर पालखी चरणी निलेश राणे नतमस्तक
मालवण | प्रतिनिधी
व्यापारीबांधव, नागरिकांच्या भेटी घेत निलेश राणे यांनी आपुलकीने साधला संवाद
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मालवणच्या सर्वात मोठया धार्मिक सोहळ्यापैकी प्रमुख सोहळा म्हणून या पालखी सोहळ्याचे स्थान आहे. प्रथा , परंपरा जोपासत हा सोहळा दर वर्षी साजरा होतो. कुडाळ -मालवण विधानसभा महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे सायंकाळी पालखी सोहळ्यात सहभागी होत देवते चरणी नतमस्तक झाले.
जेटी, बाजारपेठ मार्गांवरून रामेश्वर मांड या मार्गांवर पालखी सोबत यावेळी निलेश सहभागी झाले होते. व्यापारी, बांधव, नागरिकांच्या भेटी निलेश राणे यांनी घेत आपुलकीने संवाद साधला. अनेक नागरिक निलेश राणे यांच्या सोबत फोटो, सेल्फी घेत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर , राजु वराडकर, आबा हडकर, मोहन वराडकर, अमोल केळूसकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, पराग खोत, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी पुजा वेरलकर, तारका चव्हाण, राणी पराडकर, ममता वराडकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर यांसह युवासेना पदाधिकारी मंदार लुडबे, राजु बिडये, नारायण लुडबे, निकीत वराडकर यांसह अन्य पदाधिकारी व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.